Nanded News | थकीत बिल प्रकरणावरून पाणीपुरवठा यंत्रणेला कुलूप; एमएसईबी कार्यालयाचे भाडे मात्र थकीत : नायगावात ‘देणे-घेणे’वरून नवा वाद

नायगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या थकबाकीवरून निर्माण झालेल्या वादाला नवे वळण
Naigaon Nagar Panchayat  Water Supply Sealed
Naigaon Nagar Panchayat Water Supply SealedPudhari
Published on
Updated on

Naigaon Nagar Panchayat Water Supply Sealed

नायगाव : नायगाव शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या थकबाकीवरून निर्माण झालेल्या वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. नगरपंचायतीकडून वीजबिलाची थकबाकी असल्याच्या कारणावरून पाणीपुरवठा यंत्रणेला सील ठोकण्यात आले. मात्र, दुसरीकडे नगरपंचायत कार्यालयाच्या इमारतीत कार्यरत असलेल्या एमएसईबीच्या कार्यालयाचे भाडेच नगरपंचायतीकडे थकीत असल्याचा मुद्दा पुढे येत असल्याने शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.

नायगाव शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे वीजबिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा यंत्रणेला सील ठोकले होते. त्यामुळे ऐन शिमगा सणाच्या दिवसांत शहराचा पाणीपुरवठा काही दिवसांसाठी ठप्प झाला होता. सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, धुळवडीच्या रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने काही पैसे भरून प्रयत्न करून अखेर पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला.

Naigaon Nagar Panchayat  Water Supply Sealed
Nanded Crime News : दिल्ली, पंजाबमधील आरोपीला नांदेडमध्ये अटक

या प्रकरणात नगरपंचायतीकडून वीजवितरण कंपनीचे काही लाख रुपयांचे वीजबिल थकीत असल्याचे सांगितले जात असताना, नगरपंचायत इमारतीत सुरू असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे भाडेच थकीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे प्रशासनातील परस्पर आर्थिक व्यवहार आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील मूलभूत सुविधांवर परिणाम होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असताना या प्रकरणात मात्र उलट परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या वादाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Naigaon Nagar Panchayat  Water Supply Sealed
Nanded News : शहरातील मोकळ्या जागा मनपा उपयोगात आणणार का ?

“देणे घेणे त्यांचे, हाल मात्र नागरिकांचे?”

या संपूर्ण प्रकारामुळे नगरपंचायत व वीज वितरण कंपनी यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर आला असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोन्ही बाजूंची थकबाकी स्पष्ट करावी आणि भविष्यात शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही याची खात्री करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

“पाणीपुरवठा बंद… पण भाडे थकीत त्याचे काय?”

नायगाव नगरपंचायतच्या पाणीपुरवठा यंत्रणेला थकबाकीच्या कारणावरून सील ठोकण्यात आले. मात्र ज्या वीज वितरण कंपनीने ही कारवाई केली, त्यांचे कार्यालय नगरपंचायत इमारतीतच कार्यरत असून त्या कार्यालयाचे भाडे थकीत असल्याचा मुद्दा पुढे येत आहे. त्यामुळे प्रशासनातील परस्पर आर्थिक व्यवहार आणि समन्वयाचा अभाव उघड होत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Naigaon Nagar Panchayat  Water Supply Sealed
Nanded crime news | गुप्तधनाच्या आमिषाने मध्यरात्री शेतात खड्डा ; गडगा येथे सहा जणांना पोलिसांचा दणका

नागरिकांच्या मते, विभागांतील वाद बाजूला ठेवून पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांवर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news