Timber Smuggling Nanded | नायगाव तालुक्यासह राहेर-मांजरम परिसरात अवैध वृक्षतोड; लाकडाची परराज्यात तस्करी

वन विभाग व पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह; निष्पक्ष चौकशीची मागणी
Naigaon Illegal Tree Cutting
Naigaon Illegal Tree CuttingPudhari
Published on
Updated on

Naigaon Illegal Tree Cutting

बाळासाहेब पांडे

नायगाव : नायगाव तालुक्यासह राहेर, मांजरम आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चिंच, आंबा, पिंपळ, लिंब, बाभूळ, चिमणसाग आणि बोरी यांसारख्या पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करून त्याचे लाकूड ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहनांद्वारे परराज्यातील बाजारपेठांमध्ये पाठविले जात असल्याची चर्चा परिसरात आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सांगवी, धनंज, मेळगाव, हुस्सा, राहेर, सालेगाव, डोंगरगाव, कुंटूर तसेच तालुक्यातील इतर अनेक गावांमध्ये दिवसाढवळ्या वृक्षतोड होत असल्याचा आरोप आहे. या भागात लाकडाने भरलेली वाहने खुलेआम फिरत असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Naigaon Illegal Tree Cutting
Nanded Crime : साडेबावीस लाखांच्या मुद्देमालासह १९ गोवंशीय जनावरे मुक्त

राहेर परिसरातील विटभट्टीजवळ तसेच इतर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडाचे साठे उघडपणे ठेवण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आवश्यक परवानगीशिवाय वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असून काही ठेकेदारांनी अवैध वृक्षतोडीचे संघटित जाळे उभे केल्याचीही चर्चा परिसरात आहे.

नागरिकांच्या मते, वन विभागाकडून प्रभावी गस्त व तपासणी होत नसल्याने वृक्षतोड करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून प्रशासनाने तातडीने व्यापक मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, नायगाव, नरसी, गडगा आणि मांजरम परिसरातील काही आरा मशीनधारकांचा अवैध लाकूड व्यवहाराशी संबंध असल्याची चर्चा असून, या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांचे परवाने व लाकूड खरेदी-विक्रीची नोंद तपासावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Naigaon Illegal Tree Cutting
Nanded news | सिरजंनी रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांची बस बंद होणार

लाकडाने भरलेल्या वाहनांवर कारवाईची मागणी

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, लाकडाने भरलेले ट्रॅक्टर व इतर वाहने अनेकदा मुख्य मार्गांवरून वाहतूक करताना दिसतात. मात्र, त्यांच्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याने वन विभाग आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आरा मशीनधारकांची चौकशी करण्याची मागणी

नायगाव, नरसी आणि गडगा परिसरातील काही आरा मशीनमध्ये अवैधरित्या तोडलेले लाकूड प्रक्रिया होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित आरा मशीनधारकांचे परवाने, खरेदी-विक्रीची कागदपत्रे आणि लाकडाचा स्रोत यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Naigaon Illegal Tree Cutting
Nanded Rain News : दमदार बरसला : हिमायतनगर तालुक्यात पेरण्यांना वेग

उद्योगांकडील लाकूड खरेदीचीही चौकशी व्हावी

कृष्णूर परिसरातील काही औद्योगिक आस्थापनांकडे मोठ्या प्रमाणात लाकूड पुरवठा होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. या व्यवहारांची सत्यता तपासून, कोणत्याही उद्योगाने अवैधरीत्या तोडलेले लाकूड खरेदी केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित वन विभाग, पोलिस प्रशासन तसेच संबंधित उद्योग किंवा आस्थापनांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news