Nanded Accident | देगाव शिवारात खासगी बसने दुचाकीस्वारांना फरपटत नेले; दोघांची प्रकृती गंभीर

देगलूर-नांदेड धावणाऱ्या निळकंठेश्वर खासगी ट्रॅव्हल्सने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक
Degaon Shivar Private Bus Hits Bike
Degaon Shivar Private Bus Hits BikePudhari
Published on
Updated on

Degaon Shivar Private Bus Hits Bike,

नायगाव: नायगाव शहरालगत देगाव शिवारातील साई पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी (दि.२६) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगाने देगलूर-नांदेड धावणाऱ्या निळकंठेश्वर खासगी ट्रॅव्हल्सने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दोघांना ट्रॅव्हल्सने जवळपास 100 मीटर फरफटत नेले. या भीषण अपघातात देगाव येथील पप्पू बालाजी विभुते (वय 45), माधव चिंचलवाड ( वय 47) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. माधव चिंचलवाड यांची प्रकृती चिंताजनक असून डोक्याला व छातीला पायाला गंभीर मार लागला आहे. जोरदार लागल्याने पप्पू विभुते ची तब्येत गंभीर व चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दोघांनाही तत्काळ शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

Degaon Shivar Private Bus Hits Bike
Nanded Heatwave | नांदेड-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत शासकीय कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्‍यू

नायगाव तालुक्यात जवळपास दहा ते पंधरा खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या मुखेड-नांदेड व देगलूर-नांदेड मार्गावर धावतात. प्रवासी मिळवण्यासाठी या ट्रॅव्हल्स चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा लागते. प्रत्येक वाहनाला ओव्हरटेक करत, भरधाव वेगाने गाड्या हाकल्या जातात. एसटी बसला प्रवासी मिळू नयेत म्हणून ट्रॅव्हल्सवाले जीव धोक्यात घालून गाड्या पळवतात, असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.

आरटीओ सह पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आरटीओ विभागाच्या हप्तेखोरीमुळेच या ट्रॅव्हल्सचा बेलगाम कारभार सुरू आहे. फिटनेस, स्पीड गव्हर्नर, विमा तपासला जात नाही. स्थानिक पोलीस प्रशासनही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक काना डोळा करते,’ असा संतप्त आरोप अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Degaon Shivar Private Bus Hits Bike
Nanded Crime : गांजाची शेती; 1 लाख 3 हजारांचा गांजा जप्त

अपघाताची माहिती मिळताच देगाव व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी व रुग्णालयात मोठी गर्दी केली. ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नको, थेट 302 चा खुनाचा गुन्हा दाखल करा. चालकाचे लायसन्स कायमचे रद्द करून त्याला व ट्रॅव्हल्सच्या मालकाला तात्काळ अटक करा,’ अशी मागणी माधव चिंचलवाड व पप्पू विभुते यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news