Nanded smart meter : स्‍मार्ट मीटर ग्राहकांच्‍या माथी मारण्यासाठी महावितरणची ‘कलाकारी’

वीज ग्राहकांना वेळेत वीज बिलेच मिळेनात; अनेकांचे मीटर नंबर बदलले!
Nanded smart meter
Nanded smart meterpudhari photo
Published on: 
Updated on: 

गोविंद सरदेशपांडे

नांदेड : वीज ग्राहकांच्या विरोधानंतरही महावितरणकडून 'स्मार्ट मीटर' बसवण्याचा घाट घातला जात असून महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे हजारो वीज ग्राहकांतून तीव्र संताप व्‍यक्‍त केला जात असून अनेक भागांत महावितरणकडून जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला आहे.

ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यांची संमती न घेता महावितरणचे कर्मचारी अचानक येऊन मीटर बदलत आहेत. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शहरातील अनेक भागात अजूनही डिजिटल मीटर असलेल्‍या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, सध्या महावितरणच्‍या वतीने स्‍मार्ट मीटर बसविण्याचा सपाटा सुरू आहे. परंतु, अशा परिस्‍थितीत अनेक वीज ग्राहक हे जुन्‍याच वीज मीटरला पसंती देत आहेत. कारण स्‍मार्ट मीटरमुळे वीजबिज जास्‍तीचे येत असल्‍याचा आराेप ग्राहकांतून केला जात आहे. दरम्‍यान, महावितणच्‍या वतीने मात्र या आरोपांचे खंडन केले जात असले तरी, महावितरणच्‍या वतीने स्‍मार्ट मिटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Nanded smart meter
Ashok Chavan : निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा राहुल गांधींंचा प्रयत्न विफल

तर दुसरीकडे जुने वीजमिटर असणाऱ्या ग्राहकांना वेळेवर वीजबिल न मिळणे, अचानक हजारो रूपयांचे वीजबिल वाढून येणे यासह मीटर रिडींग न घेता ‘उपलब्‍ध नाही’, असे लिहून अव्‍वाच्‍या सव्‍वा वीजबिल आकारणी केली जात असल्‍याचे वीज ग्राहकांतून सांगितले जात आहे. विशेष म्‍हणजे अनेक जुनेच मीटर असलेल्‍या ग्राहकांच्‍या वीजबिलांवर मीटर मात्र जुने मात्र वीजबिलांवर स्‍मार्टमीटरचा नंबर टाकला जात असल्‍याचे अनेक धक्‍कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबतची तक्रार करण्यासाठी गेलेल्‍या संबंधित वीजग्राहकांच्‍या तक्रारींचा निपटारा करण्याऐवजी येथील कर्मचारी तुम्‍ही स्‍मार्ट मीटर बसवून घ्या, असा सल्‍ला देत असल्‍याचा आरोप वीज ग्राहकांतून केला जात आहे.

त्‍यामुळे महावितरणचा स्‍मार्ट मीटर ग्राहकांच्‍या माथी मारण्याच्‍या या घाईगडबडीचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना मागील अनेक काही दिवसांपासून विजेचे बिलच मिळालेले नाही. अचानक दोन-तीन महिन्यांचे एकत्र बील आल्यास महागाईच्या काळात मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती नागरिकांना भेडसावत आहे. महावितरणच्या कार्यालयात तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही नागरिकांतून केला जात आहे.

Nanded smart meter
Dharashiv News : ‘लबाडांचे आवतन’ म्हणत उबाठा शिवसेनेकडून दुष्काळी जीआरची होळी

त्‍याचप्रमाणे काही ठिकाणी प्रत्यक्ष घरात असलेला मीटर नंबर आणि बिलावर छापून आलेला मीटर नंबर वेगळाच असल्याचे समोर आले आहे. यामुळे महावितरणच्या संगणकीय प्रणालीवर आणि एकूणच कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • दरम्‍यान, वीज ग्राहकांना महावितरणच्‍या विविध योजनांची माहिती व्‍हावी, व ग्राहकांच्‍या तक्रारी ऐकून त्‍यावर तोडगा काढण्यासाठी महावितरणच्‍या वतीने नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्‍ह्यातील वीज ग्राहकांसाठी १७ ऑगस्टपासून २४ सप्टेंबरपर्यंत वीज ग्राहक समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या शिबिरामध्ये आलेल्‍या अनेक तक्रारींचा निपटारा अद्यापही महावितरणच्‍या वतीने करण्यात आलेला नाही. जर तक्रारीच दुर करायच्‍या नसतील तर वीज ग्राहक समाधान शिबिरांचा लाभ ग्राहकांनाच होत नसेल तर त्‍याचा काय उपयोग? असा सवाल देखील आता ग्राहकांतून उपस्‍थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news