Nanded ganja seizure : नांदेडमध्ये ३ लाखांच्या गांजासह दोघांना रंगेहाथ पकडले; एलसीबीची धडक कारवाई

५ किलो ५० ग्रॅम गांजा आणि एक मोटारसायकल असा एकूण ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Nanded ganja seizure
Nanded ganja seizurepudhari photo
Published on
Updated on

नांदेड : बेकायदेशीररीत्या गांजा विक्री करणाऱ्यांविरोधात नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन तरुणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून ५ किलो ५० ग्रॅम गांजा आणि एक मोटारसायकल असा एकूण ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (२४ ऑगस्ट) वसरणी परिसरातील हनुमान मंदिराजवळ करण्यात आली.

​स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांना वसरणी भागात गांजा विक्रीसाठी दोन इसम येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांच्या पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला.

Nanded ganja seizure
Nanded Crime : दोन वर्षांच्या चिमुकलीवर ३५ वर्षांच्या व्यक्तीकडून अत्याचार

या कारवाईत पोलिसांनी संशयितरीत्या मोटारसायकलसह (क्र. MH-26-AM-1389) थांबलेल्या निखील जितेंद्र चव्हाण (वय २३, रा. शांती नगर) आणि नवनाथ लक्ष्मीकांत झंझरवार (वय २१, रा. महंतवाडी, चौफाळा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पोत्याची झाडाझडती घेतली असता ५.०५० किलोग्रॅम गांजा (किंमत ₹२,५२,५००) आढळून आला. हा गांजा त्यांनी लातूरच्या पाणगाव येथील कुणाल गलफडे याच्याकडून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Nanded ganja seizure
Chhatrapati Sambhajinagar Crime : नशेची तलफ भागवण्यासाठी दुचाकी चोरी ; सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार पुरवठादाराचा शोध सुरू आहे.​

फरार आरोपीचा शोध सुरू; पोलिसांचा इशारा

जप्त केलेला गांजा लातूर येथील कुणाल गलफडे याच्याकडून आणल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिली आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा तीव्रतेने शोध घेत आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर व प्रभावी कारवाई सुरू राहील, असा इशारा नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news