

Nanded Lack Of Rain Farmer In Tention
भोकर, पुढारी वृत्तसेवा : रिमझिम पाऊस झाला अन् पेरणीचे दिवसं निघून जातील या भीतीनं शेतकऱ्यांनी पेरणी केली. पुन्हा आठवडा रिमझिम झाली आणि पीक परिस्थिती चांगली वाटू लागली. पण, मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. यामुळे पिकं माना टाकू लागली आहेत. निसर्गावर शेती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून 'पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी..., शेत माझं लई तान्हेलं... चातकावाणी...' अशी विनवणी शेतकरी आकाशाकडे बघत करत आहेत.
भोकर तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता तालुक्याच्या बाहेरून शेती सिंचनासाठी पाणी घेता येत नाही. आणि मोठ्या प्रकल्पासाठी तशी मोठी साइडही उपलब्ध नाही. तालुक्यात जी काही तोकडी सिंचन व्यवस्था आहे, तिच्यावर केवळ १२ टक्के शेती सिंचनासाठी येते. सध्या सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याचा व पिंपळढव साठवण तलावचा प्रस्ताव मंजूर असल्याने या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरू आहे. हे दोन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण झाले तरी फार मोठी सिंचन व्यवस्था उपलब्ध होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. कोरडवाहू शेती करणे म्हणजे आमदनी आठन्नी खर्चा रुपया असा काहीसा प्रकार झालेला आहे.
भोकर तालुक्यातील कोरडवाहू शेतीला सिंचनाची जोड देणे आवश्यक आहे. जवळपास ८७ टक्के शेती कोरडवाहू असल्याने या शेतीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. कोरडवाहू शेती करणे म्हणजे 'आमदनी आठन्नी खर्चा रुपया' असा काही प्रकार झालेला आहे.
भोकर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता तालुक्याच्या बाहेरून शेती सिंचनासाठी पाणी घेता येत नाही. आणि मोठ्या प्रकल्पासाठी तशी मोठी साइडही उपलब्ध नाही. यामुळे तालुक्यात जेवढ्या नद्या आहेत त्या नद्यावर कुठे कोल्हापुरी तर कुठे सिमेंट बंधारे घेऊन पाणी आडवावे लागेल आणि प्रत्येक गावात एक तलाव उभारण्याचे काम हाती घ्यावे लागेल तरच सिंचन व्यवस्था वाढायला मदत होईल.