

Nanded Lack of Rain Banana orchards and sugarcane fields, sowing difficult
नांदेड, पुढारी वृत्तसेवा मे महिन्याच्या २८ तारखेला विष्णुपुरी प्रकल्पात २०.०१५ टके जलसाठा होता. जूनच्या २५ तारखेला किंचित वाढ होऊन २३.२२ टक्के झाला. तर आज १५ जुलै रोजी २३.६८ टके आहे. पाण्याची आवक शून्य आहे. तुलनेत जायकवाडी थरणात मेच्या २८ तारखेला २९.७९ टके साठा होता. आज तो ७३.१९ टक्के आहे आणि आवक ४९ दशलक्ष घनमीटर प्रतिदिन आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरीच्या लाभक्षेत्रात अजिबात पाऊस नसल्याने ताज्या पेरण्या अडचणीत आल्या असून केळीच्या बागा स उसाचे मळेसुद्धा संकटात सापडले आहेत.
लाक्षणिक अनि मृग नक्षत्रापासून पावसाळा सुरू होतो. परंतु नदिष्ट जिए- ह्याचा हिशोब वेगळा आहे. येथे अभ्यर्थी जुलैनंतर पावसाला सुरुवात होते. तसा अर्धा जुलै संपला आहे. परंतु ऊन कडक असून उकाडाही प्रचंड आहे. मृगाचा मुहुर्ताचा पाऊस झाला.
त्यानंतर लोकांनी आर्याकडून आशा व्यक्त केल्या. या पंधरवड्यात एखाद दुसरा छलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे पेरण्यांना दिलासा मिळाला. पुनर्वसू आणखी तीन दिवसांनी संपणार आहे. पण, या पंधरवड्यातसुद्धा एकच पाऊस झाला. त्यामुळे पिकांना केवळ उभारी मिळाली. आता पेरण्यांना खऱ्या अधनि पावसाची नितांत आवश्यकता आहे.
पेरण्या जेमतेम तगल्या असल्या तरी सोयाबीनर अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप गहिरे आहे. पुढे पावसाळा बराच शिलतक असल्याने महापालिकेने मोठ्या कपातीची अंमलबजावणी केली नाही, परंतु त्या विचारात मनपा प्रशासन असल्याचे कळते.
भूजल पातळीत किंचितही बाद झालेली नाहीं. उलट दैनंदिन उपश्यामुळे त्यात पटच होत चालली आहे. दि. १९ रोजी सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होणार आहे. त्या पंधरवड्यात तरी परंपरेप्रमाणे पाऊस हौस भागवतों की कसे, हे पाहणे महत्वाचे उरणार आहे.