

नांदेड : हिमायतनगर तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा शिरकाव सुरू झाला असल्याने जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . पशुवैद्यकीय विभागाने या लंपी आजारांसाठी गावोगावी जाऊन लशीकरण करण्याची गरज आहे. पळसपुर येथील शेतकऱ्यांचे लंपी आजाराने जनावरं दगावल्याची घटना घडली असुन शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने तातडीने यंत्रणा कामाला लावावी व तालुक्यातील सर्व जनावरांना लसीकरण करून लंपी आजारावर आळा घालावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील शेतकरी दगडू जाधव यांच्या मालकीच गायीला लंपी आजाराची लागन झाली होती. तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार देखील केले परंतु तिचा लंपी आजाराने घेरले असल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला असुन अनेक जनावरांना लागणं झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असुन शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यातील घाण केरकचरा यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या घाणीमुळे व डासांच्या प्रार्दुभावाने जनावरांना लंपी आजाराचा फैलाव होत असल्याची माहिती आहे.
पशुवैधकीय आरोग्य विभागाने जनावरांच्या आरोग्यासाठी शेतकऱ्यांना लशीकरण व औषधी देण्याची नितांत गरज आहे परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांना अद्यापही औषधी व या रोगावर नियंत्रण करण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या नाहीत तातडीने लंपी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाऊले उचलावीत अन्यथा लंपीचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी योगेंद्र ऐवतीकर यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात लंपी आजाराने जनावरांना घेराव घातला आहे त्यासाठी आमच्या टीमसह मी ग्रामीण भागातील जवळपास विस गावांमध्ये जाऊन जनावरांना लसीकरण केले आहे.शेतकऱ्यांनी देखील जनावराची काळजी घ्यावी आपल्या शेतात जनावरे बांधण्यात येणाऱ्या गौठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी कडू लिंबाच्या झाडांचे धूप करून डास राहणार नाही याची दक्षता घ्यावी लंपी आजाराची लागन दिसुन आल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.