Nanded Crime News | किनवट येथे ५ लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ : पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेला शिवीगाळ, मारहाण, जिवे मारण्याच्या धमक्या
FIR
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

Married Woman Harassment for Dowry Kinwat Police

किनवट : पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण केली. या प्रकरणी मंजुषा गेडाम (वय ३१, रा. जिजामाता कॉलनी, मांडवा रोड, किनवट) यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरोधात किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी मंजुषा गेडाम यांनी महिला सहाय्यक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे तक्रार दिल्यानंतर त्या ८ जून रोजी किनवट पोलीस ठाण्यात हजर झाल्या. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

FIR
Illegal liquor seizure | नांदेड परिक्षेत्रात ७ लाख ७५ हजारांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दि. १ ऑगस्ट २०१५ पासून ते १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पती किशन नागोराव गेडाम, सासरे नागोराव गेडाम, सासू शकुंतला गेडाम आणि नणंद अनुसया नागोराव गेडाम यांनी संगनमत करून सतत छळ केला. पाच लाख रुपये माहेरून आणावेत, म्हणून शिवीगाळ, मारहाण व जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि अखेर तिला घराबाहेर काढण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम वाडगुरे करत असून, कार्यवाही प्रभारी पोलीस निरीक्षक चोपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

FIR
नांदेड : कॉम्प्युटर क्लासला जाताना ट्रॅक्टरच्या धडकेत तरुण ठार, दोघे गंभीर जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news