Nanded Crime | शेतकरी हत्या प्रकरण : ३ आरोपींना कोठडी तर आणखी एकजण ताब्यात

मुख्य सूत्रधार व फायनान्स चालकाचे नाव पोलिसांनी गोपनीय ठेवल्याने पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह
Nanded Crime News
नांदेड : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सोमवारी मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी सोबत आमदार श्रीजया चव्हाण होत्या.pudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : खालसा फायनान्स चालक व कर्मचाऱ्यांनी कर्ज वसुलीसाठी एका शेतकऱ्याचे अपहरण करून खून केल्याचे धक्कादायक प्रकरण राज्यभर गाजत आहे. या गुन्ह्यातील अटक केलेल्या तीन आरोपींना नांदेड न्यायालयाने सोमवारी (दि. २६) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत; म्हणून त्यांचे अपहरण करून फायनान्स कार्यालयात डांबून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह कार्यालयातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी जयकुमार ऊर्फ शेरा गायकवाड, शेख आमेर आणि इम्रान खान यांना अटक केली आहे.

Nanded Crime News
Beed Drought : 'बैलजोडीला बाळसं राहणार नाही, आबाळ होईल'

घटनेला तीन दिवस लोटूनही चंद्रकांत शिंदे यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप समोर आलेला नाही. तसेच मुख्य सूत्रधार व फायनान्स चालकाचे नाव पोलिसांनी गोपनीय ठेवल्याने पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस सध्या ११ पथकांच्या माध्यमातून जप्त दस्तऐवज, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल क्रमांकांच्या आधारे बेकायदा आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.

तपासाची दिशा आणि पुढील प्रतीक्षा

खालसा फायनान्सची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. या प्रकरणातील मुख्य फायनान्स चालक आणि पसार साथीदार कधी जाळ्यात अडकणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून बेकायदा आर्थिक व्यवहारांचा चिठ्ठा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nanded Crime News
Rashi Bhavishya Today: आज मनातली गाठ सोडवण्याचा दिवस; मेहनतीचे फळ हळूहळू दिसू लागेल; पाहा, तुमची रास काय सांगते?

सक्तीची वसुली होत असेल तर पुढे यावे

मयत चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सोमवारी माळकौठा येथे जाऊन भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच खाजगी सावकार, फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांना सक्तीची कर्ज वसूली करत असतील तर अशांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन केले. यावेळी बोर्डीकर यांच्या सोबत भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण या उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news