Rashi Bhavishya Today: आज मनातली गाठ सोडवण्याचा दिवस; मेहनतीचे फळ हळूहळू दिसू लागेल; पाहा, तुमची रास काय सांगते?

Horoscope 27 October 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on: 
Updated on: 

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आज हट्टापेक्षा युक्त्ती कामी येईल. रेंगाळलेले काम मार्गी लावण्याची संधी. पैशाच्या बाबतीत उत्साहाला लगाम घाला.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : तुमच्या शांत स्वभावाची आज परीक्षा होईल. जुन्या ओळखीतून नवी वाट सापडेल. छोट्या आनंदात मोठे समाधान मिळेल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : तुमच्या बोलण्याला आज विशेष धार असेल; पण प्रत्येक गोष्ट विनोदात उडवू नका. नव्या कल्पनेला कामाचे रूप देता येईल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : मनातली गाठ सोडवण्याचा दिवस आहे. जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. घरात तुमच्या मताला महत्त्व मिळेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आज प्रसिद्धीपेक्षा कामगिरी बोलू द्या. वरिष्ठांकडून अनपेक्षित दाद मिळू शकते. खर्च करताना रुबाबापेक्षा गरज पाहा.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : छोट्या तपशिलातून मोठा प्रश्न सुटेल. कामातील गोंधळ आवरण्याची संधी मिळेल. स्वतःच्या अपेक्षांचे ओझे कमी करा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : दुसऱ्यांना खूश करताना स्वतःला विसरू नका. भागीदारीत स्पष्ट बोलणे फायद्याचे ठरेल. जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : एखादे गुपित आज उलगडण्याची शक्यता. रागाच्या भरात निर्णय घेणं टाळा. नवी जबाबदारी तुमची ताकद दाखवेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : नेहमीची वाट सोडून नवा प्रयोग करा. प्रवास किंवा भेटीतून कल्पना मिळेल. वेळेचे नियोजन केल्यास धावपळ वाचेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मेहनतीचे फळ हळूहळू दिसू लागेल. जुने प्रलंबित काम आधी पूर्ण करा. नात्यांत हिशेबापेक्षा आपुलकी ठेवा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : वेगळा विचार आज तुमची ओळख बनेल. मित्राकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. मोठ्या निर्णयाआधी व्यवहार तपासून घ्या.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : अंतर्मनाचा आवाज आज उपयोगी पडेल. कलेतून किंवा लेखनातून आनंद मिळेल. अनावश्यक खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news