Nanded illegal sand mining : गोदावरी पात्रातून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त; दोन हायवांसह बोटी नष्ट

अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात नांदेड पोलिसांची धडक मोहीम
Nanded illegal sand mining
Nanded illegal sand miningpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून, नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात चालणाऱ्या वाळू उपशावर मोठी कारवाई केली आहे. पिंपळगाव व भनगी शिवारात केलेल्या या कारवाईत दोन हायवा ट्रकसह २ कोटी १६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ४ सप्टेंबरच्या रात्री गुन्हे शोध पथकाने पिंपळगाव ते वाडीपाटी रस्त्यावर सापळा रचला. यावेळी ५ ब्रास वाळू वाहून नेणारे दोन हायवा ट्रक (किंमत ९०.५० लाख) पकडण्यात आले.

Nanded illegal sand mining
Latur DJ free Ganesh festival : यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव

​चालकांच्या चौकशीनंतर पथकाने थेट नदीपात्रातील रेती धक्क्यांवर छापे टाकले. पोलिसांना पाहताच वाळू माफिया पात्रात उड्या मारून फरार झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून १ कोटी १ लाखांच्या ७ फायबर बोटी, ९ लाखांची ३ इंजिने आणि १७.५० लाखांचे ३५ तराफे नष्ट केले. तसेच तराफ्यांवरील ७० ब्रास वाळू नदीत उलटवून दिली. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पोउपनि व्यंकट कुसमे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

Nanded illegal sand mining
Beed Crime : बीडमध्ये औषधांचा नशेसाठी सर्रास वापर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news