Nanded illegal gas cylinders : नांदेडमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघडकीस

आठ लाखांच्या मुद्देमालासह चालकाला अटक
Nanded illegal gas cylinders
Nanded illegal gas cylinderspudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे मूळ उपटून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीररीत्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री व वाहतूक करणाऱ्या एका चालकाला रंगेहात पकडण्यात आले असून, त्याच्याकडून वाहनासह ८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक रविवारी (दि. १३) हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान उस्माननगर रस्त्यावरील कोहिनूर मिलच्या समोर एका छोट्या हत्ती वाहनातून व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याची गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती पथकाला मिळाली.

Nanded illegal gas cylinders
Nanded Police Combing Operation : नांदेडमध्ये पोलिसांचे मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’

​वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता, संशयित 'टाटा इंट्रा छोटा हत्ती' (क्रमांक MH-26-CH-4677) हे वाहन आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये भारत कंपनीचे व्यावसायिक वापराचे गॅसने भरलेले लाल आणि पिवळ्या रंगाचे ५२ सिलिंडर आढळून आले.

​वाहनातील चालक श्यामलाल शंकरलाल सारन (वय ३२, रा. बोजासर, जि. फलोदी, राजस्थान; सध्या रा. शिवाजीनगर, मुखेड, जि. नांदेड) याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सदर सिलिंडर काळ्या बाजारात विक्री व रिफिलिंगसाठी आणल्याचे कबूल केले. गॅस सिलिंडरची वाहतूक व विक्रीबाबत त्याच्याकडे कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे नव्हती.

Nanded illegal gas cylinders
Ausa rainfall shortage : औसा तालुक्यात पावसाच्या खंडाने सोयाबीन, उडीद संकटात

​ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बी. ई. चव्हाण, पोलीस अंमलदार लक्ष्मण जाधव, जमीर व गुरुनाथ कारामुंगे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जप्त केलेला मुद्देमाल

​टाटा इंट्रा छोटा हत्ती वाहन: किंमत रु. ६,००,०००/- ५२ भरलेले गॅस सिलिंडर: (प्रत्येकी रु. ४,५०० प्रमाणे) किंमत रु. २,३४,०००/- ​एकूण जप्ती: रु. ८,३४,०००/- ​या प्रकरणी आरोपी श्यामलाल सारन याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कलम ३ व ७ सह महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news