Nanded Police Combing Operation : नांदेडमध्ये पोलिसांचे मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’

सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले, दोघा फरारींना बेड्या
Nanded Police Combing Operation
Nanded Police Combing Operationpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे आणि शारीरिक स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी नांदेड पोलीस दलाने मध्यरात्री धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार शनिवारी (दि. १२) रात्री ११ ते रविवारी (दि. १३) पहाटे ३ वाजेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात विशेष ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगार आणि असामाजिक तत्वांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

​या चार तासांच्या विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्रे बाळगणारे, तडीपार व्यक्ती, हिस्ट्रीशीटर आणि फरारी आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान तब्बल ७५ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून दोन फरारी आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

Nanded Police Combing Operation
Sanjeevani Bet Latur : संजीवनी बेटाला संशोधनाची ‘संजीवनी’ कधी ?

संशयितांवर मपोका १२२ अंतर्गत कारवाई

मध्यरात्री संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अन्वये एकूण ४ गुन्हे दाखल करून ४ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वजिराबाद पोलीस ठाण्यात १, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात २, तर लिंबगाव पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल झाला आहे. ​

अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि आरसीपी पथकाने या मोहिमेत प्रत्यक्ष उतरून कारवाई केली. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर मोहिमा सातत्याने राबवणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Nanded Police Combing Operation
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा आज पाटोद्यात मुक्काम

कारवाईचा थोडक्यात लेखाजोखा:

  • ​तैनात पोलीस बळ: ६१ अधिकारी आणि १९८ अंमलदार.

  • ​तडीपार/प्रस्तावित गुन्हेगार तपासणी: २१

  • ​'एमपीडीए' (MPDA) अंतर्गत सुटलेले गुन्हेगार: २५

  • ​तपासलेले सराईत गुन्हेगार: ७५

  • ​अटक फरारी आरोपी: ०२

  • ​बजावलेले समन्स व वॉरंट: ५४ समन्स, २५ बेलेबल आणि ०२ नॉन-बेलेबल वॉरंट बजावून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news