Soybean Seed Failure | हिमायतनगरात सोयाबीन बियाण्यांची उगवणी नाही; शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी

संबंधित बियाणे विक्रेता व कंपनीची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी,
Soybean Seed Failure | हिमायतनगरात सोयाबीन बियाण्यांची उगवणी नाही; शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी
Pudhari
Published on
Updated on

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. 'उन्नती' व 'बूस्टर' कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही अपेक्षित उगवण झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. संबंधित बियाणे विक्रेता व कंपनीची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यात पुरेसा पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र, संबंधित कंपनीच्या बियाण्यांची अनेक शेतांमध्ये अत्यल्प उगवण झाली, तर काही ठिकाणी उगवणच झाली नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Soybean Seed Failure | हिमायतनगरात सोयाबीन बियाण्यांची उगवणी नाही; शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी
Nanded farmer news : पावसाचा खंड, पिके संकटात: लोहा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

या संदर्भात पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, लेखी तक्रार सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मशागत व पेरणीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले असून आर्थिक फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात कृषी विभागाने संबंधित बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत, शेतपातळीवर पंचनामे करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Soybean Seed Failure | हिमायतनगरात सोयाबीन बियाण्यांची उगवणी नाही; शेतकऱ्यांकडून चौकशीची मागणी
Nanded Court News | पत्नीला मारहाणीप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास

यंदाच्या खरीप हंगामात बियाणे व खतांच्या खरेदीदरम्यान काही कृषी दुकानदारांकडून जादा दर आकारण्यात आल्याचे आरोपही शेतकऱ्यांनी यापूर्वी केले होते. या तक्रारींकडे संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी पुरेसे लक्ष दिले नसल्याने आज अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

दरम्यान, संबंधित कृषी सेवा केंद्र किंवा बियाणे कंपनीची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. तसेच बोगस बियाणे किंवा गैरव्यवहार झाल्याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नसून, कृषी विभागाच्या चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news