Nanded Court News | पत्नीला मारहाणीप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास

किनवट न्यायालयाचा निकाल; दंडाचीही शिक्षा, पोलिसांच्या तपासाला यश
सश्रम कारावास
सश्रम कारावासpudhariphoto
Published on
Updated on

Kinwat Court Verdict

किनवट : कौटुंबिक वादातून पत्नीला काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी किनवट येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपी मारोती मोहनाजी टारपे (रा. पांधरा, ता. किनवट) याला दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात किनवट पोलिसांनी केलेल्या तपासामुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होण्यास मदत झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२६ रोजी पांधरा (ता. किनवट) येथे कौटुंबिक वादातून मारोती टारपे याने पत्नी शकुंतला टारपे यांना काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून किनवट पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सश्रम कारावास
Nanded soybean cotton sowing-नांदेड जिल्ह्यात नगदी पिकांवर भर; सोयाबीन, कापसाची पेरणी सुसाट

या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ओंकार पुरी यांनी करून आवश्यक पुरावे संकलित केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एम. माने यांनी आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) व ११५(२) अंतर्गत दोषी ठरविले.

न्यायालयाने दोन्ही कलमांअंतर्गत प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता डी. ए. झाडे यांनी बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल रवीकुमार वागतकर यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.

सश्रम कारावास
Nanded SIR voter verification-नांदेडमध्ये एसआयआर मोहिमेला आला वेग

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत ट्रायल मॉनिटरिंग सेलमार्फत न्यायालयीन खटल्यांवर विशेष देखरेख ठेवली जात आहे. या प्रकरणात प्रभावी तपास, पुराव्यांचे योग्य सादरीकरण आणि खटल्याचा पाठपुरावा यामुळे आरोपी दोषी ठरल्याने पोलीस अधीक्षकांनी किनवट पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तपासी अधिकारी आणि कोर्ट पैरवी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news