Nanded farmer news : पावसाचा खंड, पिके संकटात: लोहा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

शेतकरी आपल्या शेतामध्ये वा आजूबाजूला पाणी उपलब्ध करून आपल्या शेतातील पिकांना हाताने पाणी देत आहेत
Nanded farmer news
Nanded farmer news
Published on
Updated on

लोहा : तालुक्यात मागच्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकरी स्वतःकडे असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांमधून पिके वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

Nanded farmer news
Sangli News : अल्प पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात

लोहा तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्ण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध पिकाची पेरणी पूर्ण केली आहे. त्यानंतर पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जागेवरच करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागच्या अनेक दिवसापांसून तालुक्यात पाऊस बरसला नसल्याने पिके जमिनीमध्ये कोमजण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही भागांमध्ये पिके कोळपणी करण्याच्या तयारीत आहेत. पण मागच्या अनेक दिवसांपासून पाऊसच पडला नाही, त्यामुळे पीके करण्याच्या परिस्थितीमध्ये दिसून येत आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत असून शेतातील पिके सुकण्याच्या बेतावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Nanded farmer news
Kolhapur News | कोल्हापूर-सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पाणी उपसाबंदी शिथिल

लोहा तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे डोंगर भागातील पिके पाऊस नसल्यामुळे लवकरच करपण्याच्या परिस्थितीत आहेत. पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये वा आजूबाजूला पाणी उपलब्ध करून आपल्या शेतातील पिकांना हाताने पाणी देत आहेत. अनेक शेतामध्ये पहावयास मिळत असून हा प्रयोग किती दिवस चालणार यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र अनेक भागांमध्ये पाहावयास मिळत आहे.

Nanded farmer news
Jalna News | विहीरींनी गाठला तळ बोअरवेलमध्येही ठणठणाट : मिरची ‘सलाईन’वर; पाण्याअभावी भोकरदन तालुक्यातील शेतकरी संकटात!

लोहा तालुक्यातील माळेगाव, माळाकोळी, रिसनगाव डोंगरगाव लिंबोटी पेनुर जोमेगाव, धनज, पळशी भेंडेगाव बोरगाव जवळा आंबे सांगवी कलंबर पोखरी भागातील शेतीमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे ते समजल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी विविध प्रयोग करून शेतातील पिके वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या शेतीमध्ये दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news