

Nanded Heavy Rainfall
नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे सर्वदूर पाणीच पाणी झाले होते. परिणामी नदी, नाले आणि ओढयांना आलेल्या पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून, वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने संसप्लोपयोगी साहित्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबीय हे उघड्यावर आले आहेत.
पुराच्या पाण्यात असंख्य पशुधनही वाहून गेले आहेत. शेतांमध्ये पाणी साचल्याने हाता तोंडाशी आलेली पिकेही जमीनदोस्त झाल्याने, शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून, उघड्यावर आलेल्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी आता सर्वचस्तरातून होत आहे.
मखेड लेंडी प्रकल्पातील पाण्याची पातळी ३९० मि.मी. पाठास झाल्यामुळे प्रकल्पबाधित हसनाळ, रावणगाव, मारजवाडी, भिंगोली, भेंडेगाव (खु), भासवाड़ी ही गावे पाण्याखाली गेली आहेत, मुक्रमाबाद मंडळातील धडकनाळ पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे, राबी गावचा संपर्क तुटला अशी माहिती माथव पांचाळ यांनी दिली. येवती मंडळातील अखरगा येथील तलावच ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने होनवडज येथील दलितवस्तीत पाणी शिरल्याची माहिती येवतीचे मंडळ अधिकारी संजय जांभळे यांनी दिली. अतिवृष्टीमुळे दापका गु. भागातील नाल्यामुळे दलित वस्तीत पाणी गेल्याने तेथील कुटुंबाना शाळेत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे सरपंच प्रतिनिधी बालाजी लटकोडे यांनी सांगितले, याशिवाय मोती नदीच्या पाण्यामध्ये दोन बैल व एक गाय वाहून गेली आहे.
बिलोली: बुधवारी (दि. २७) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील चारही मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. नाले ओसंडून वाहत असल्याने सकाळी दहापासूनच बिलोली नरसी वाहतूक बंद कारण्यात आली आहे. महाराष्ट्र तेलंगाणा राज्याला जोडणाऱ्या येसगी येथील मांजरा नदीला अक्षरशः समुद्राचे रूप आले आहे. जुना पूल बुधवारी रात्रीपासूनच पाण्याखाली गेला असून सालूरा जॅकवेलपर्यंत पाणी पोहचले आहे. गुरुवारी आ. जितेश अंतापूरकर, तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान, बालाजी मिठेवाड यांनी चेसगी पूल येथे भेट देऊन पाहणी केली....
भोकर मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने भोकर तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून नदीकाठावरील शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गावांतील घरात पाणी शिरले असल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. भोकर, तामसा रस्त्यावरील सुधा नदीत कार वाहून जात असताना बोरगावच्या गावकऱ्यांनी प्रवाशांना व कारला सुखरूप बाहेर काढले. रामू नाईक तांडा येथील जनावरे वाहून गेले सलग धो धो पडणाऱ्या पावसाने नांदा म्हैसा पट्टी, रेणापूर, धानोरा, कोळगाव बु, रा यणगाव, सोनारी, मातुळसह पंधरा गावांतील काही घरात पाणी शिरले. रामू नाईक तांडा येथील बनतळे फुटल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अतुल चव्हाण या शेतकन्याचे दोन बैल व दोन म्हशी, तीन लेख्ख्या पाण्यात वाहून गेले. अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना दोन दिवसांत मदत करून, शेतीचेही पंचनामे करण्याचे आश्रासन तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिले.
चाहाळी: मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांचे संसार उबडघावर आलेले आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री यांनी स्वतः हुन राजीनामा देऊन लेंडी धरणाचे कार्यकारी अभियंता तिडके यांना कायमस्वरुपी निलंबित करावे, अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी हसनाळ येथे भेटीदरम्यान केली आहे. शेट्टी यांनी हमनाळसह रावणगाव, दोन्ही भेंडेगाव, भिंगोली, मारजवाडी, भासवाडी, भाटापूरत भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. दरम्यान एका रात्रीत दुग्धव्यवसाय नष्ट झालेल्या खंकरे परिव ाराचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे, जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगीरे, शिवशंकर पाटील कलंबरकर, किशोर डगे, किशनमामा कदम, हरिभाऊ कदम आदी उपस्थित होते.