Nanded News : जिल्ह्यात दोन नक्षत्रांतच ४९ टक्के पाऊस !

'मघा'मध्ये 'माझा विध्वंस बघा'चे संबंध जिल्ह्याला दर्शन
Nanded Rain News
Nanded News : जिल्ह्यात दोन नक्षत्रांतच ४९ टक्के पाऊस ! File Photo
Published on
Updated on

49 percent rainfall in just two nakshatra in the district!

विशेष प्रतिनिधी नांदेड : यंदाच्या पावसाळ्यात मृग ते पुष्य या नक्षत्रांपर्यंत जिल्ह्यात जेमतेम ३९ टक्के (३४८ मि.मी.) नोंद करणार्या पावसाने 'मघा' नक्षत्राच्या आरंभी आणि शेवटच्या पर्वात अक्षरशः धुमाकूळ घालत विक्रमांची नोंद केली. जिल्ह्यात आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी ८८ वर गेली असून 'मधा' आणि 'आश्लेषा' या दोन नक्षत्रांमध्ये तब्बल ४९ टक्के पाऊस बरसला.

Nanded Rain News
Nanded News : जळकोट तालुक्यावर आभाळ फाटले; शेतांना तळ्यांचे स्वरुप

गणरायांच्या आगमनानंतर गुरुवार-शुक्रवार दरम्यान नदिड शहर व परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये वरुणाने जबरदस्त कहर केल्याचे बघायला मिळाले. या दरम्यान जिल्ह्यातील तब्बल ६९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आधीच विस्कळीत झालेल्या जनजीवनाचा एका रात्रीतूनच बोऱ्या वाजला. 'जिकडे तिकडे पाणीच, पाणी चोहीकडे' असे शुक्रवारच्या सकाळच्या एकंदर दृश्य होते.

पावसाळ्यातील नक्षत्रांपैकी 'मघा' नक्षत्र हे जोरदार पर्जन्यमानासाठी पूर्वापार ओळखले जाते. यंदा जिल्हावासीयांनी या नक्षत्रातील पावसाचा विध्वंस आरंभी आणि शेवटी अनुभवला. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी 'आश्लेषा' नक्षत्र संपले. तत्पूर्वी जिल्ह्यात ३९ टक्के पाऊस झाला होता.

Nanded Rain News
Nanded Heavy Rain|पुरामुळे जूने कुचेली गाव वेढले; 100 हून अधिक नागरिकांची एनडीआरएफकडून सुटका

जिल्ह्यातील अतिवृष्टी (तारीखनिहाय)

१० जून-९ महसूल मंडळं, २६ जून-३९ मंडळं, २४ जुलै-४ मंडळं, २७ जुलै-१७ मंडळं, ८ ऑगस्ट-५ मंडळं, १५ ऑगस्ट-२७ मंडळं, १६ ऑगस्ट-४ मंडळं, १७ ऑगस्ट-२४ मंडळं, १८ ऑगस्ट-८ मंडळं, १९ ऑगस्ट ९ मंडळं, २८ ऑगस्ट-१७ मंडळं आणि २९ ऑगस्ट-६९ मंडळं. यंदा आषाढ महिन्यात पावसाने बरीच ओढ दिली होती; पण श्रावण आणि आताच्या भाद्रपदमध्ये जिल्ह्याने पावसाचा कहर अनुभवला.

तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे

(कंसात दि. १ जूनपासून पडलेला पाऊस) नांदेड १६९.९० (८५८.१०), बिलोली ९७ (६५५.१०), मुखेड १५०.३९० (७११.३०), कंधार २३६ ९८२६.२०), लोहा २१३.२० (८२५.२०), हदगाव ९२.३० (८२८.४०, भोकर १०९.४० (७७२), देगलूर १०७ (६४२.८०), किनवट ४२.८० (९०६), मुदखेड १७६.१० (९२३.५०), हिमायतनगर ५०.३० (८९०.९०, माहूर ५६.२० (७८१.८०, धर्माबाद, उमरी,, अर्धापूर, नायगाव १०८.६० (६७६.१०). (दि. १ जूनपासून ते दि. २९ ऑगस्टपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत १२४.७५ टक्के पाऊस झाला आहे. तर दि. १ जून ते दि. ३१ ऑक्टोबर या पावसाळ्याच्या हंगामात जेवढा पाऊस पडतो त्या तुलनेत ८८.३२ टक्के पाऊस झाला आहे.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news