Illegal Sand Mining | हदगाव तालुक्यात वाळूचे दर गगनाला; अवैध वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाळूचे दर प्रचंड वाढले असून सर्वसामान्य नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका
Hadgaon  Illegal Sand Mining
Hadgaon Illegal Sand Mining Pudhari
Published on
Updated on

Hadgaon Illegal Sand Mining

हदगाव : तालुक्यात वाळू घाटांच्या लिलावाबाबत प्रशासनाची ठोस भूमिका स्पष्ट नसल्याने वाळूचे दर प्रचंड वाढले असून सर्वसामान्य नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या वाळूची टंचाई निर्माण झाल्याने अनेक बांधकामे रखडली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात वाळू माफियांची सक्रियता वाढली असून अवैध वाळू वाहतूक खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बाहेरील तालुक्यांतून येणाऱ्या वाळूच्या ट्रकांवर पोलिस कारवाई करत असले तरी हदगाव परिसरात सुरू असलेल्या स्थानिक ट्रॅक्टर व टिप्परकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. काही बाहेरील वाहनांवर कारवाई करून ती पोलिस ठाण्यात उभी करण्यात आली असली, तरी स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या वाहतुकीवर ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार आहे.

Hadgaon  Illegal Sand Mining
Nanded Crime News : बायकोला गळफास देऊन मारले; पतीला अटक

वाढत्या वाळू दरांचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर स्पष्टपणे दिसून येत असून बांधकाम साहित्य विक्रेते, ठेकेदार आणि मजुरांच्या रोजगारावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

दरम्यान, बाभळी, चेडकापूर, साप्ती, बोरगाव, धानोरा, रुई, बनचिंचोली, गोर्लेगाव, बेलमंडल, गुरफळी आणि मनुला या प्रमुख वाळू घाटांच्या लिलावाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. स्थानिक पातळीवर याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यात तीन पोलिस ठाणे असतानाही अवैध वाळू वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. गौण खनिज विभागाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत असून, खुलेआम सुरू असलेल्या या व्यवसायावर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी वाळू माफियांसोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचीही चर्चा रंगत आहे.

Hadgaon  Illegal Sand Mining
Nanded Crime : नांदेडमध्ये गँगवॉरनंतर 24 तासांत चौथा खून

जप्त वाहनावरही कारवाईचा अभाव

हदगाव पोलिस ठाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळूने भरलेला एक टिप्पर (हायवा) उभा आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी उमरी तालुक्यातील हे वाहन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी या संदर्भात गौण खनिज विभागाला माहिती दिल्याचे सांगितले असले, तरी पुढील कारवाईबाबत अद्याप स्पष्टता नाही. यासंदर्भात माहिती विचारण्यासाठी पत्रकारांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

दरम्यान, वाढते वाळू दर, अवैध धंद्यांना मिळणारे संरक्षण आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे हदगाव तालुक्यात परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news