Nanded Crime : नांदेडमध्ये गँगवॉरनंतर 24 तासांत चौथा खून

शहरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
 Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

नांदेड ः शहरात शुक्रवारी मध्यरात्री गँगवॉरमध्ये झालेल्या तिघांच्या मृत्यूची घटना ताजी असताना आता आणखी एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला असून, त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जुना मोंढा मुरमुरा गल्ली येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रज्जुसिंघ ऊर्फ रंजितसिंघ तबेलेवाले याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या तबेलेवाले याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मनप्रीतसिंघ व परमज्योतसिंघ कांचवाले या भावांना ताब्यात घेतले आहे. तबेलेवाले (35) हा गुरुद्वारा परिसरातील रहिवासी आहे. त्याची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. घटनेच्या काही तासांच्या आत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

गँगवॉरमधील आरोपींना कोठडी

शुक्रवारच्या गँगवार घटनेनंतर पोलिसांनी साई लाला गँगचे शाबेर खान बशीर खान आणि सोनू कैलाश राऊत यांना, तर सदा गँगमधील नागेश लडे, संभाजी क्षीरसागर, प्रदीप चव्हाण आणि गजानन चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे. या सहाजणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news