

He killed his wife by hanging her; Husband Arrested
मुखेड, पुढारी वृतसेवा : तालुक्यातील कर्णा या गावी नव-याने बायकोला आपल्या रहात्या घरी अंगावरील साडीने गळफास देवुन मारुन टाकल्याची घटना तालुक्यातील कर्णा या गावात घडली.
या बाबतीत सविस्तर वृत असे की, अरोपी मारोती रामकिशन खांडेकर याने ५ एप्रील रोजी रात्री ८ ते ६ एप्रिल रोजी सकाळी दरम्यान आपली पत्नी स्वाती मारोती खांडेकर, (३०) हिला आपल्या रहाते घरी अंगावरील साडीने गळफास देवुन मारुन टाकले. व अरोपी मारोती रामकिशन खांडेकर हा फरार झाला. सकाळी त्याचे लहान मुलाने आई उठत नसल्याचे बघुन आरडाओरड केल्याने ही बाब लोकांच्या निदर्शनास आली.
या संदर्भात मयत स्वातीच्या भाऊ योगेश गणपत देवकते (२० वर्ष रा. एकलारा) यांनी मुखेड पोलिस ठाणे येथे येवुन बहिणीचे पती मारोती बाबुराव खांडेकर यांनी माझ्या बहिणीचा खुन केल्याची तक्रार केली. त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कर्णा परिसरात आरोपीचा शोध चालु केला असता अरोपी कर्णा शिवारातंगर्त शेता शेताने पळत असल्याचे दिसून आले. पोलीसानी चार तास पाठलाग करुन अखेर अरोपीला अटक केली.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजीत तुतुरवाड पुढील तपास करत आहेत.