शिरसवाडी हादरली! पार्टीनंतर गाढ झोपेत असलेल्या तरुणाचा निर्घृण खून; संशयित आरोपी जेरबंद

पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

जालना : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका २५ वर्षीय तरुणाचा झोपेत असताना गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील शिरसवाडी येथील वाघमारे शेत वस्तीवर घडली. शुक्रवारी (दि. १०) रात्री ११:३० ते १२ च्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

निखिल वाघमारे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, असे अटकेतील अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि निखिल हे दोघे चांगले मित्र होते. मात्र, निखिलचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीने वारंवार येत होता. याच रागातून अल्पवयीन आरोपीने निखिलचा काटा काढण्याचे ठरवले.

शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोघांची पार्टी झाली. त्यानंतर निखिल गाढ झोपेत असताना आरोपीनेने त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात निखिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. फरार होण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

शनिवारी सकाळी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. दुपारी शोकाकुल वातावरणात शिरसवाडी येथे निखिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुका जालना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिगंबर पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news