Nanded farmer power crisis|आदमपूर परिसरात 12 तासाऐवजी 8 तास थ्री फेज वीज; शेतकरी तिहेरी संकटात

Nanded| आदमपूर परिसरात 12 तासाऐवजी 8 तास थ्री फेज वीज; शेतकरी तिहेरी संकटात
light
light file photo
Published on: 
Updated on: 

आदमपूर - बिलोली तालुक्यातील आदमपूर व परिसरात गेल्या एका महिन्यापासून शेतकऱ्यांसाठी पुन्हा आठ तास थ्री फेज विद्युत सप्लाय देण्यात आला आहे. यामुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. या आठ तासांमध्ये पिकापर्यंत पाणी पोहोचतच नाही. त्यात अधूनमधून सात आठ वेळेस लाईट जाते, त्यामुळे पाणी देणे अवघड झाले आहे.

light
​illegal gambling raid Nanded : नांदेडात पोलिसांचे जुगार अड्ड्यावर छापे

शासन एकीकडे शेतकऱ्यांसाठी २४ तास लाईट देऊ असे आश्वासन दिले. नंतर शासन दिवसा शेतकऱ्यांसाठी बारा तास थ्री फेज देऊ असे म्हणाले. पण ते वचन पूर्ण करण्यात अपयश आले आहे. आता तर निव्वळ बारा तासाऐवजी आठ तास लाईट ते पण दोन-तीन तास वीज लाईट मध्येच गायब होते.

दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आता तिहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः पाण्याविना वाळून गेले आहे. खतगाव ३३ केव्हीचा कारभार झाला आहे.

तिथे तीन ऑपरेटर कंत्राटी पद्धतीवर असल्यामुळे सध्या तरी हे ३३ केव्ही केंद्र वाऱ्यावर असल्यासारखे आहे. तरी शेतकऱ्यांचा विचार करून ८ तास ऐवजी १२ तास ते पण दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.

light
Nanded Thief | हिमायतनगर तालुक्यात आंतरराज्यीय चोरांची टोळी सक्रिय; पोलिस प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news