​illegal gambling raid Nanded : नांदेडात पोलिसांचे जुगार अड्ड्यावर छापे

१२ जणांवर गुन्हे, ५.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

​नांदेड : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या निर्देशानुसार राबवल्या जात असलेल्या अवैध धंदेविरोधी विशेष मोहिमेंतर्गत देगलूर पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली. शेळगाव शिवारात चालणाऱ्या 'तिर्रट' जुगारावर आणि शहरात चालणाऱ्या 'मटका' जुगारावर टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, रोख रकमेसह तब्बल ५ लाख ३२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिली कारवाई शेळगाव ते कारेगाव रस्त्यावरील शिवारात करण्यात आली. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून परीविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक किरण बेंबडे आणि पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला.

Crime News
Manoj Jarange Patil | मंडप-व्यासपीठ काढले तरी अंतरवालीच आंदोलनाचे केंद्र : मनोज जरांगे पाटील

या प्रकरणी गंगाराम भाईकटे, अर्जुन माटलवार, साईनाथ माधवाड, धुळप्पा पारशेवार (सर्व रा. शेळगाव) यांच्यासह पळून गेलेले चालक शादुल शेख, राजू पाटील, विजय पाटील, अनिल सगरोळे व राजू चोंडे या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या ठिकाणाहून पोलिसांनी ८,८३० रुपयांची रोख रक्कम, ५० हजारांचे ४ मोबाईल, ४.५ लाखांच्या ७ दुचाकी (मोटारसायकली) आणि पत्ते असा एकूण ५ लाख ८ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

​दुसरी कारवाई ईदगरह परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक मैसनवाड यांच्या पथकाने मोबाईलवर 'श्रीदेवी' व 'टाईम बाजार' नावाचा मटका खेळवणाऱ्या माधव तलवारे, तिरुपती तलवारे (दोघे रा. आचेगाव) आणि मटक्याची आकडेमोड घेणारा सुशील बोडके (रा. बोरगाव) या तिघांवर गुन्हा नोंदवला. त्यांच्याकडून ३,३३० रुपये रोख व २० हजारांचे २ मोबाईल असा २३,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Crime News
Marathwada crop loss survey : मराठवाड्यात पीक पंचनामे सुरु

​या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १२,१६० रुपये रोख, ६ मोबाईल, ७ मोटारसायकली असा एकूण ५.३२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार शेख अब्दुल बारी, पंडित बळदे, शिवाजी आडबे, माधव मरगेवाड व मोहम्मद इम्रान यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news