Nanded Farmers cheated at the market committee
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदणीकृत आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याची बाब पुढे आली असून याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, संदीप देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकारी कर्डिले यांनी तातडीने दखल घेत जिल्हा उपनिबंधकाशी चर्चा केल्यानंतर २८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांची बैठक बोलावल्याने संबंधित आडत व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नांदेडसहित जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे आडत व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, हळद, तूर, मूग, उडीद इ. शेतमालाची खरेदी करीत असतात. परंतु आडत व्यापाऱ्यांकडून शेतीमालाची कच्ची नोंद घेतली जाते. अनेक व्यवहारात कुठलीही वजन पावती, पोचपावती दिली जात नाही असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी केला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असून शेतकऱ्याकडे तक्रार देण्यासाठी कुठलाही पुरावा उपलब्ध नसतो. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांची अशाप्रकारे आर्थिक फसवणुक सुरु असून आता या प्रकरणी शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन उपरोक्त गंभीर प्रकार लक्षात आणून देताच जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बैठक आयोजित केली आहे.
त्यामुळे आता नांदेड सहित जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतमालाच्या कच्च्या व्यवहाराचे गैरप्रकार ऐरणीवर येणार असल्याचे बोलले जात आहे. आडत व्यापाऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करताच शेतकऱ्यांना आवक पावती, वजन पावती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी तसेच आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची योग्य ती चौकशी करून हक्काच्या शेतमालाची रक्कम मिळवून देण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, संदीप देशमुख उपस्थित होते.
भाजपाच्या संकल्पपूर्तीतील...
ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे, जगदीश कदम, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, प्रा. आत्माराम चव्हाण, पत्रकार आनंद कल्याणकर आदींच्या पुढाकारातून नुकतीच बैठक झाली. या वॉकिंग ट्रॅकची देखभाल चांगल्याप्रकारे व्हावी, तेथे नियमित साफसफाई करण्यात यावी, झाडांची योग्य ती निगा राखली जावी इ. मागण्या बैठकीतून समोर आल्या. या सर्वांनी एक गट तयार केला असून या गटातर्फेच संबंधितांकडे निवेदन सादर करण्यात आले.
'हिंद की चादर' या कार्यक्रमासाठी ...
आयटीआय ते अण्णाभाऊ साठे चौक रस्ता पुर्णपणे बंद, हिंगोली गेट भुमिगत ब्रिज, बर्की चौक ते जुना मोंढा, कविता हॉटेल ते जुना मोंढा, भगतसिंघ चौक ते श्रीराम चौक, अहिल्याबाई होळकर चौक ते मामा चौक, लिंबगाव ते वाघी रस्ता बिडीडीएस कार्यालय ते मामा चौक, रविनगर ते नागार्जुना शाळा व बस्वेश्वर पुतळा ते भगतसिंघ चौक असे शहरात येणारे सर्व मार्गावरील वाहतुक दोन दिवस तात्पुरत्या स्वरुपात बंद राहणार आहे.