

Nanded division should be connected to Central Railway, MP Chavan urges Railway Minister
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : भारतीय रेल्वेने दक्षिण तटीय रेल्वे या नवीन झोनची निर्मिती प्रक्रिया सुरू करताच मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांना पुन्हा वाचा फुटली आहे. नांदेड रेल्वे विभाग सध्याच्या दक्षिण मध्य रेल्वेतून वगळून मुंबई मुख्यालय असलेल्या मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. असून, हे भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या असंयुक्तिक असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. करून रेल्वेच्या नवीन झोन निर्मितीनंतर दक्षिण मध्य रेल्वेतील सहापैकी तीन विभाग नवीन झोनमध्ये जाणार आहेत.
उरलेल्या तीन विभागांत नांदेडचा समावेश आहे. सिकंदराबादसोबतच ठेवण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, हीच संधी साधून नांदेडला मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी रेल्वे मंत्र्यांना ठणकावून सांगितले.
सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर हे पाचही महत्त्वाचे विभाग मध्य रेल्वे झोनमध्ये येतात. मात्र, केवळ नांदेड विभागच तेलंगणातील सिकंदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेशी जोडलेला आहे. हे भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या असंयुक्तिक असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. तेलंगणा केंद्रित कारभारामुळे मराठवाड्यातील प्रवाशांच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नांदेडवर अन्याय का?
मुख्यालय परराज्यात असल्याने समन्वयाचा अभाव.
वेळापत्रकाचा फटका बसत असून, मराठवाड्यातील प्रवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष.
* अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू.
* महाराष्ट्रातील सर्व विभाग एकाच झोनमध्ये असावेत हा मुख्य उद्देश.