नांदेड जिल्‍हा सहकारी बँक : उपाध्यक्षपदासाठी हालचाली; पण 'बोलाचाली' ठप्प !

ज्येष्ठ कार्यकर्ते हरिहर भोसीकर यांच्या निधनामुळे बँकेत एक संचालकपद आणि उपाध्यक्षपदही रिता झाले आहे.
नांदेड जिल्‍हा सहकारी बँक
नांदेड जिल्‍हा सहकारी बँक : उपाध्यक्षपदासाठी हालचाली; पण 'बोलाचाली' ठप्प !File Photo
Published on
Updated on

Nanded District Co-Opertive Bank News

संजीव कुळकर्णी

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात मागील काही दिवसांत संबंत्रितांच्या हालचाली दिसून आल्या, पण बँकेतील तीन गटांच्या प्रमुखांतील 'बोलाचाली' अद्याप ठप्प अहेत.

नांदेड जिल्‍हा सहकारी बँक
Sahasrakund Waterfall : पैनगंगेवरील फेसाळणारा अजुबा, सहस्त्रधारांनी कोसळणारा धबधबा !

ज्येष्ठ कार्यकर्ते हरिहर भोसीकर यांच्या निधनामुळे बँकेत एक संचालकपद आणि उपाध्यक्षपदही रिता झाले असून ही दोन्ही पदे येत्या २१ व २२ जुलैच्या बैठकीत स्वतंत्रपणे भरली जाणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार हननंतराव पाटील बेटमोगरेकर यांची उपाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून त्यांच्यासाठी मंगळवारी रात्री नांदेडमध्ये झालेल्या एका अनौपचारिक बैठकीला संचालकांचा चांगला बँकेचे अध्यक्षपद भास्करराव खतगावकर यांच्या रूपाने राष्ट्रवादी कब्रिस पक्षाकडे असल्याच्या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष पदासाठी आता काँग्रेस आणि भाजपाशी संबंधित संचालकांत चुरस निर्माण झाली आहे.

भाजपा नेते खा. अशोक चव्हाण मंगळवारी सायंकाळी नांदेडमध्ये आले, तरी ते प्रकृतीच्या कारणावरून अस्वस्थ दिसले त्यांच्या मर्जीतील गोविंदराव नागेलीकर यांना उपाध्यक्ष करण्यासाठी त्यांची सारी भिस्त खतगावकरांवर असली, तरी १४ जुलै रोजी शंकरराव चव्हाण जयंतीनिमित होणाऱ्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये खतगावकर यांना स्थान देण्यात आलेले नाही. खा. चक्षाण आणि संयोजक संतुका पांडागळे यांनी मित्रपक्षाच्या दोन स्थानिक आमदारांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.

नांदेड जिल्‍हा सहकारी बँक
Nanded News : 'वंदे भारत'चा जल्लोष; पण बससाठी चालक-वाहक नाहीत ! राजू शेट्टी यांनी मांडले वास्तव

पण खतगावकर-चिखलीकर हेही मित्रपक्षाचेच नेते असूनही त्यांना बेदखल केले गेल्याची चचां संबंधितांत होत आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीत खतगावकर चिखलीकर यांचा संयुक्त गट आणि खा. अशोक चव्हाण यांच्या ऐकण्यातील संचालक एकत्र येणार का, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. भास्करराव खतगावकर यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असली, तरी ते विश्रांतीसाठी नवी मुंबईतील निवासस्थानी बांबले असल्यामु‌ळे उपाध्यक्ष पदासंदर्भातील 'बोलाचाली' सुरू झालेल्या नाहीत, पण छठगावकर व चिखलीकर यांच्यात प्राथमिक चर्चा गेल्या आठवड्यातच झाली आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी बेटमोगरेकर यांच्यासाठी भास्करराव खतगावकर यांची प्राथमिक पेट घेतली. त्यानंतर ते चिखलीकर यांना मुंबईमध्ये भेटले आणि बोललेही, त्यावर चिखलीकर यांनी नांदेडमध्ये सविस्तर बोलू, असे त्यांना सांगितल्यानंतर संबंधितांना या बोलाचालीची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले,

चित्र १५ तारखेनंतरच स्पष्ट होईल

बँकेचे उपाध्यक्षपद तसे सहा-सात महिन्यांचेच आहे. बँकेत पूर्वी उपाध्यक्षपदाला वाहन दिले जात असे; पण आता दोन्ही पदाधिकाऱ्यांना बँकेचे वाहन नाही. उपाध्यक्षास विशेष अधिकार नसले, तरी बँकेच्या मुख्यालयात या पदासाठी स्वतंत्र व सुसज्ज दालन आहे. या दालनात बसण्याचा मान मिळविण्यासाठी बेटमोगरेकर नागेलीकर यांच्यात चुरस असल्याचे दिसत असले, तरी या दोघांतून ऐनवेळी कोणी तिसराच पुढे येतो का, हे पुढील आठवडयात, १५ तारखेनंतर स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news