

Nanded District Central Cooperative Bank News
संजीव कुळकर्णी
नांदेड ज्येष्ठ कार्यकर्ते हरिहर विश्वनाथराव भोसीकर यांच्या निधनामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये आधी त्यांचे संचालकपद आणि सोबतच उपाध्यक्षपदही रिक्त झाले; पण राजकीय चतुराईतून आधी उपाध्यक्षषद भरले जात असून त्यासाठी येत्या २२ जुलै रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.
भोसीकर यांचे प्रदीर्घ आजारपणानंतर मे महिन्यात निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेमध्ये त्यांच्या निधनाची नोंद घेऊन त्यांचे संचालकपद आणि बँकेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले असल्याचे विभागीय सह निबंधक व्यणि जिल्हा उप निबंधक यांना कळविण्यात आले होते.
सहकारी संस्थांच्या संचालक मंडळात रिक्त झालेले पद भरण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कार्यपद्धती निश्चित करुन दिली असून नांदेड जिल्हा सह, बँकेत माजी अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे गतवर्षी निधन झाल्यानंतर पुढील काही महिन्यांनी रिक्त जागा भरली गेली वसंतराव तेव्हा केवळ संचालक होते, त्यांच्या जागी त्यांचे पुत्र खा. रवीन्द्र चव्हाण यांची संचालक मंडळाने बिनविरोध निवड केली होती.
याच धर्तीवर दिवंगत पुजारी हरिहरराव यांचे पुत्र शिवकुमार भोसीकर यांनी घडलांच्या संचालकपदाच्या रिक्त जागेवर आपली निजड व्हावी, याची आवयक ती जुळवाजुळव केली आहे, पण लातुरच्या विभागीय सह निबंधक कार्यालयाने बँकेतील हरिहरराव भोसीकर यांचे संचालकपद रिक्त झाल्याचे निवडणूक प्राधिकरणास कळविलेच नाही. या कार्यालयाने केवळ उपाध्यक्षपद रिक्त झाल्याचे आणि ते भरण्याबाबतचे पत्र प्राधिकरणाला पाठविल्यामुळे प्राधिकरणाने जिल्हा उप निबंधकांची अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्त करन बँकेतील रिक्त उपाध्यक्षपद भरण्याची जवाबदारी त्यांच्यावर सोपविली.
प्राधिकरणाच्या दि.२३ जूनच्या पत्रानुसार जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे यांनी बँकेच्या नव्या उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी २२ जुलै रोजी संचालक मंडळाची विशेष बैठक अयोजित केली आहे. या बैठकीची सूचना त्यांनी २५ जून रोजी जारी केली. याच पत्रात त्यांनी उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर हरिहरराव भोसीकर यांचे पुत्र शिवकुमार यांनी आपल्या बडलांचे रिक्त झालेले संचालकपद भरण्यापूर्वीच आधी उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया केली जात आहे, याकडे सहकार आयुक्तालयातील संबंधित विभागाकडे लक्ष वेधल्यानंतर या कार्यालयाने त्याबाबतची माहिती बैंक प्रशासनाकडून जाणून घेतली, पण रिक्त झालेले संचालकपद केव्हा भरले जाणार, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीस आणखी २३ दिवसांचा कालावधी आहे. यादरम्यान संचालकाची रिक्त जागा भरण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यास वाव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. भोसीकरांचे रिक्त संचालकपद आधी न भरता उपाध्यक्षपद आधी भरण्याचा निर्णय चमत्कारिक जाणकारांनी स्पष्ट केले. असल्याचेही जाणकारांनी स्पष्ट केले.