

Gram Sevak took money for Gharkul Yojana survey
बाऱ्हाळी, पुढारी वृत्तसेवा : सामान्य लोकांसाठी सरकार योजना आणत असते. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे योजनेचा फायदा अनेकांना मिळत नाही. घराचं स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सरकारने घरकुलाची योजना सुरू केलीय. पण भ्रष्ट अधिकारी योजनेचा फायदा सामन्य लोकांना पोहोचू देत नाही. योजनेचे पैसे लाभार्थ्यांना देण्यासाठी अधिकारी लाच मागत असतात, असा प्रकार समोर आला आहे.
शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत सध्या सुरू असलेल्या लाभार्थी सव्र्व्हेदरम्यान मेथी (ता. मुखेड) येथील ग्रामसेविका अलका गंगाधरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ग्रामसेविका सर्वसामान्य लाभाथ्यर्थ्यांकडून प्रति अर्ज १५०० ते २००० पर्यंतची रक्कम घेऊनच सर्व्हे करत आहे.
या संदर्भात कृष्णकांत हाणमंत शिंदे व गजानन उत्तम शिंदे यांनी मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात व्हिडिओ चित्रीकरणासह ठोस पुरावे देखील असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पैसे घेऊ माझे कोणीही काही करू शकत नाही असे ग्रामसेविका अलका गंगाधरे यांनी असे उद्धट वक्तव्य करत नागरिकांची थेट आव्हान दिले आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून, त्यांनी अशा भ्रष्ट व भ्रष्टाचाराला पाठबळ देणाऱ्या कर्मचाऱ्यावर तत्काळ चौकशी करून कठोर कारवाई, तसेच बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
विवाहित असेल तर त्याला घरकुल यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दीड हजार रुपये आणि अविवाहित असेल तर त्याला दोन हजार रुपये. अविवाहित लोकांसाठी ही योजना नसूनही पैशांची देवाणघेवाण करून मेथी ग्रामपंचायतीत शंभरपेक्षा जास्त अविवाहित लाभार्थी असल्याचेदेखील आरोप आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.