Nana Patole : विविध मुुद्द्यां‌वरून अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार

निवडणुका मतपत्रिकांवर घ्या; जनता जागा दाखविल : नाना पटोले
Nana Patole
Nana Patole pudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : दुष्काळ जाहीर होऊनही राज्य सरकार गंभीर नाही, शेतकरी, सर्वसामान्य जनता तसेच बेरोजगारांची या सरकारला काहीही चिंता नाही. या प्रमुख मुद्द्या‌वरून हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, अधिवेशनानंतर जनआंदोलन उभारू, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

सोमवारी नांदेड दौर्‍यावर आलेले नाना पटोले यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तो आजचाच दिवस आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपाने लोकशाहीची हत्या केली. दिवसा ढवळ्या मतांची चोरी होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ४६ लाख मते वाढली, तर विधानसभा निवडणूक नंतर २ कोटी १७ लाख मते कमी झाली आहेत.

Nana Patole
Chakur Bus Stand : चाकूर बसस्थानक बनले दुचाकी पार्किंगचे आगार!

याचे उत्तर सरकारही देत नाही आणि निवडणूक आयोगही देत नाही. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा हिशेब दिला जात नाही. सत्ताधार्‍यांकडून लोकशाहीची हत्त्या होत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

राज्यात १९७२ पेक्षा दुष्काळाची दाहकता अधिक आहे. त्या काळी पाणी होते, आज राहणार नाही, धान्य आणू पाणी कोठून आणणार? असा प्रश्न पटोले यांनी केला. राज्य सरकारने दुष्काळ घोषीत करून शेतकर्‍यांना ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली, परंतु ८० टक्के शेतकर्‍यांपर्यंत ही मदत पोहोचलीच नाही, असे सांगून पटोले म्हणाले, जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे.

Nana Patole
Beed Leopard Attack : बिबट्यांचा मानवी वस्त्यांकडे मोर्चा; घागरवाड्यात गायीचा बळी!
  • अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात येणार आहेत, असे मी म्हणलो नव्हतो. भीतीपोटी ते गेले, पाच माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षात येणार, अशी दिल्लीत चर्चा आहे. मी पक्षाचा मालक नाही, अशोक चव्हाण ज्येष्ठ आहेत, त्यांच्याविषयी आदर आहे, त्यामुळे आमच्याबद्दल त्यांनी असे वक्तव्य करू नये, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.