Nanded Illegal Sand | नायगाव पोलिसांचे ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’: अवैध रेतीचे तीन टिप्परसह १ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ मोहीम
Naigaon police operation crackdown
Naigaon police operation crackdown Pudhari
Published on
Updated on

Naigaon police operation crackdown

नायगाव : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ मोहिमेंतर्गत नायगाव पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत तीन टिप्परांसह तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्हाभर या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यातील अवैध धंदे, रेती तस्करी व बेकायदा वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक शशांत एन. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलिसांनी पहाटे ही कारवाई केली.

Naigaon police operation crackdown
Nanded Crime News : अंध महिलेचे मंगळसूत्र पळवणारी महिला अवघ्या दोन तासात जेरबंद

सहायक पोलीस उपनिरीक्षक सोपान वळगे, पोलीस कर्मचारी नारायण नंदेवार व ज्ञानेश्वर पुणेबोईनवाड हे शासकीय वाहनातून गस्त घालत असताना पहाटे सुमारे १.५४ वाजण्याच्या दरम्यान गडगा-कहाळा मार्गावरील मांजरम बसस्थानक परिसरात पोहोचले. त्यावेळी कोलंबीकडून भरधाव वेगाने येणारे तीन संशयित टिप्पर पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी तत्काळ वाहनांना अडवून चौकशी केली.

तपासणीदरम्यान संबंधित टिप्परमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. चालकांकडे रेती वाहतुकीसंदर्भातील कोणतेही वैध परवाने अथवा कागदपत्रे आढळून आली नाहीत.

Naigaon police operation crackdown
Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात...

चौकशीत चालकांनी आपली नावे प्रताप पंडीतराव मोरे (रा. टाकळी बु., ता. नायगाव), योगेश बळीराम दापरवाड (रा. मारतळा, ता. लोहा) व अक्षय रावसाहेब बन्ने (रा. हातनूर, ता. लोहा) अशी सांगितली.

या कारवाईत पोलिसांनी टिप्पर क्रमांक MH-04-HY-6481 किंमत अंदाजे २० लाख रुपये व त्यामधील दोन ब्रास रेती, तसेच टिप्पर क्रमांक MH-46-AF-3200 आणि MH-03-CP-7224 हे प्रत्येकी सुमारे ४० लाख रुपये किंमतीचे टिप्पर व त्यामधील प्रत्येकी पाच ब्रास रेती असा मोठा मुद्देमाल जप्त केला. वाहनांसह रेतीची एकूण किंमत सुमारे १ कोटी ६० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news