Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात...

खून, चोऱ्या, बनावट नोटाप्रकरणात सक्रिय सहभाग
Nanded Crime News
नांदेड जिल्ह्यात अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात...pudhari photo
Published on
Updated on

संतोष जोशी

नांदेड : जिल्हा हा शिक्षणाचा हब म्हणून ओळखल्या जातो मात्र, ही ओळख पुसली जात असून, शिक्षणाचे हब नाही तर क्राईम कॅपिटल अशी ओळख होत आहे.यामध्ये अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत असल्याने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. जिल्ह्यातील दोन महिन्यांतील घटनांचा मागोवा घेतला असता अल्पवयीन मुलं खून, चोऱ्या, दुचाकी चोऱ्या, बनावट नोटांच्या प्रकरणात सक्रिय सहभागी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहेत.

शहरात गेल्या कांहीं दिवसांत झालेला गँगवॉर व पाच हत्यांच्या घटनांमुळे नांदेडच सामाजिक स्वास्थ्य बिघडले ही बाब अधोरेखित होते. मात्र, नांदेड गुन्हेगारांसाठी पोषक का बनलं आहे.याच्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. नांदेड मध्ये गुन्हेगारीला मिळालेला सेफ पॅसेज आणि गुन्हेगारी कडे वळलेल्या अल्पवयीनांना ना पालकाचा, ना पोलिसांचा धाक राहिला आहे.

Nanded Crime News
Ratnagiri : सोने व्यापार्‍याचे अपहरण पडले महागात; मुंबईतून चौघे ताब्यात

नांदेड मधील 12 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुलं गुन्हेगारी क्षेत्रात उतरले आहेत. याची उदाहरणे द्यायची झाली तर, दोन महिन्यांपूर्वी गोवर्धन घाट पुलाजवळ तीन अल्पवयीन मुलांनी पैश्याच्या कारणावरून 16 वर्षाच्या मुलाचा खंजरने भोसकून खून केला.ज्याचा खून झाला तोही चोऱ्यामाऱ्या करणाराच होता. या प्रकरणात वजिराबाद पोलिस ठाण्यात फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात तरोडा खुर्द भागात भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार ते पाच जणांच्या अल्पवयीन गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून तब्बल 17 दुचाकी जप्त करण्यात आले.

मार्च महिन्यात सुरुवातीला माहूर तालुक्यातील एका जत्रेत 500 च्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता त्याचा मास्टरमाइंड दुसरा निघाला मात्र, बनावट नोटा चलनात आणण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केला गेला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणखी ऐका अल्पवयीन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला.12 ते 17 वयोगटातील चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून 20 दुचाकी जप्त केले. तसेच या दोन महिन्यांत जवळपास 5 ते 6 चोरीच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आला आहे.

Nanded Crime News
Ratnagiri : टीडब्ल्यूजे कंपनीच्या गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

पालकांनी जागरूक राहण्याची गरज

आपला पाल्य कुठल्या वाम मार्गाला लागला नाही ना, वाईट मुलांच्या संगतीत तर नाही ना, तसेच त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत. मोबाईलमध्ये काय पाहतो, काय करतो, तसेच घरातील लोकांशी कसा वागतो यावरून आपल्या मुलांचे वर्तन , लक्षण पालकांना दिसून येते त्यामुळे वाम मार्गाला जाण्याच्या अगोदरच त्याला रोखण्यासाठी पालकांनी अधिक जागरूकता दाखवणे आवश्यक आहे.

अल्पवयीन नशेखोरीच्या आहारी...

वयाच्या 10 ते 12 वर्षांच्या मुलांना नशा करण्याची दारु, सिगारेट, व्हाईटनर, खोकल्याचे औषध, फेविस्टीक, गांजा, गुटखा तसेच नशेचे पदार्थ सेवन करण्याच्या सवयी लागत आहेत, यातून चैन करण्यासाठी अल्पवयीन मुलं छोट्यामोठ्या चोऱ्या करू लागले आहेत.या चोऱ्यांकडे दुर्लक्ष झाले की, त्यांचे मनोबल वाढून मोठे गुन्हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news