Nanded News | हिमायतनगर नगरपंचायत अपहार प्रकरण; बांधकाम लिपिकाला क्लीन चिट

८ लाख ५५ हजारांच्या निधी अपहाराचा आरोप; जिल्हा प्रशासनाच्या चौकशीत तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट
Clean Chit
Clean ChitPudhari
Published on: 
Updated on: 

Himayatnagar Nagar Panchayat Scam

हिमायतनगर : हिमायतनगर नगरपंचायतीचे बांधकाम लिपिक विठ्ठल शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या आर्थिक अनियमितता आणि निधी अपहाराच्या आरोपांना पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभागाने केलेल्या सखोल चौकशीत शिंदे यांच्याकडून कोणताही आर्थिक अपहार अथवा गैरव्यवहार झाल्याचे आढळले नाही. यासंदर्भातील अधिकृत अहवाल नगरपंचायत प्रशासनाला प्राप्त झाला असून, शिंदे यांना आरोपांतून क्लीन चिट मिळाली आहे.

नगरपंचायतीचे तत्कालीन बांधकाम लिपिक विठ्ठल शिंदे यांनी बनावट स्वाक्षरी करून ८ लाख ५५ हजार ९५० रुपयांचा निधी उचलला आणि त्याचा अपहार केला, अशी तक्रार विद्यमान नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभागाने प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Clean Chit
Nanded News : फायनान्सच्या तगाद्याला कंटाळलेल्या आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवले

त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या बांधकाम विभागातील नोंदी, देयके, तांत्रिक मंजुरी आणि आर्थिक व्यवहारांची बारकाईने पडताळणी केली. सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी केल्यानंतर बांधकाम लिपिक विठ्ठल शिंदे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक अपहार किंवा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकशीचा अधिकृत अहवाल आणि पत्र जिल्हा नगरपरिषद प्रशासन कार्यालयाकडून नगरपंचायत कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे निधी अपहाराच्या आरोपांतून शिंदे यांना निर्दोष ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांवर जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालामुळे पडदा पडला आहे.

माझी कोणत्याही प्रकारची चूक नसताना विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला.

- विठ्ठल शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.