Manoj Jarange Patil : नांदेड : मनोज जरांगे पाटलांची तोफ उद्या नायगावात धडाडणार; ४० एकरवर विराट सभा

Manoj Jarange Patil : नांदेड : मनोज जरांगे पाटलांची तोफ उद्या नायगावात धडाडणार; ४० एकरवर विराट सभा

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नायगाव शहरातील बैल बाजार मैदान येथे ४० एकरवर सभा पार पडणार आहे. या विराट सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (दि.६) पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. त्या अनुषंगाने सीमावर्ती भागासह उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर, मुखेड आणि नायगाव तालुक्यांतील सभा नायगाव शहरातील ५५ एकर मध्ये असलेल्या बैल बाजार मैदान येथे शुक्रवार दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था त्याच रस्त्यावर करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तासोबत मराठा स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. महिला अबाल वृद्ध यांच्या येण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. सभा वेळेवर आणि सुरळीत पार पडावी यासाठी काटेकोरपणे नियोजन केले आहे. सभेला येणाऱ्या मराठा बांधवांना पाणी आणि भोजनाची व्यवस्था केली जाणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news