Assembly Winter Session | शेतकरी प्रश्नी विरोधक आक्रमक, गळ्यात लिंबू, संत्र्यांचा माळा घालून विधानभवन पायऱ्यावर घोषणाबाजी | पुढारी

Assembly Winter Session | शेतकरी प्रश्नी विरोधक आक्रमक, गळ्यात लिंबू, संत्र्यांचा माळा घालून विधानभवन पायऱ्यावर घोषणाबाजी

पुढारी ऑनलाईन : आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. दरम्यान, राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुद्द्यावरून आज अधिवेशन सुरु होण्याआधी विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षातील आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी विधानसभा भवनातील पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. (Assembly Winter Session)

यावेळी विरोधी पक्षांनी मागणीचे फलक, लिंबू, संत्री, कापसाचे बोंडे असलेल्या माळा गळ्यात घालत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा विरोध केला. विधानभवन परिसरात काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनेकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावेळी खोके सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Assembly Winter Session)

यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. हे सरकार असंवेदनशील असून, झोपलेल्या सरकारला जागे आणण्यासाठी आम्ही विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करत असल्याचे ते म्हणाले. (Assembly Winter Session)

तसेच २०२२ मध्या झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आली नाही, त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करत, शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांची असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे (Assembly Winter Session)

हेही वाचा:

Back to top button