Nanded Youth End of Life|सासरी अपमानाने व्यथित तरुणाने संपवले जीवन; पत्नी, सासू-सासऱ्यांसह चौघांवर गुन्हा

आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून छळाचे आरोप; उमरखेड तालुक्यातील धानोरा येथील घटना
Youth End of Life
Youth End of Life
Published on: 
Updated on: 

उमरखेड : पत्नी, सासू-सासरे आणि पत्नीच्या कथित प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून २४ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवलले. उमरखेड तालुक्यातील धानोरा (साचलदेव) येथे ही घटना घडली.

जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासरी अपमान व छळाचे आरोप केल्याच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी पत्नी, सासू-सासरे आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

गजानन दत्ता पुरी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे सुमारे दोन वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर येथील ऐश्वर्या हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर पती-पत्नीत किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचे आणि पत्नीला माहेरून आणण्यासाठी गेलेल्या गजाननचा अपमान करून तिला परत पाठविले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पत्नी माहेरी गेल्यानंतरही गजाननला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पत्नी चार महिन्यांची गर्भवती असताना तिला दवाखान्यात नेण्यासाठी गजानन कृष्णूर येथे गेला होता. तेथून परतल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी झालेल्या कौटुंबिक वादानंतर त्याने पत्नीच्या कथित अपमानास्पद वागणुकीबाबतची माहिती आई-वडिलांना दिली. पत्नी व सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ आणि अपमान होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या त्रासाला कंटाळून गजाननने १ नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास आईने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडून पाहिले असता, तो घरातील पंख्याच्या लोखंडी रॉडला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरविण्यात आले.

Youth End of Life
Nanded News : मनमानी कारभार भोवला! नायगाव पंचायत समितीतील डेटा एन्ट्री ऑपरेटर पांडे यांची उचलबांगडी

गजाननने लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीच्या त्रासाचा उल्लेख असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी पत्नी ऐश्वर्या पुरी, सासू सुमन अशोक गिरी, सासरे अशोक काशिनाथ गिरी आणि मारोती जाधव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत.

Youth End of Life
Tushar Rathod | मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील कामचुकारांना हटवून कार्यक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा : आ. डॉ. तुषार राठोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.