Tushar Rathod | मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील कामचुकारांना हटवून कार्यक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा : आ. डॉ. तुषार राठोड

रुग्णसेवेचा दर्जा खालावल्याने सर्वसामान्यांचा विश्वास कमी
Mukhed Hospital   Staff Action
Mukhed Hospital Staff ActionPudhari
Published on: 
Updated on: 

Mukhed Hospital Staff Action

मुखेड : मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असून, सर्वसामान्य नागरिकांचा रुग्णालयावरील विश्वास कमी होत असल्याबद्दल आमदार डॉ. तुषार राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालय प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुधारणा कराव्यात. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्यत्र हलवून त्यांच्या जागी कार्यक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांनी केली.

मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत आमदार डॉ. तुषार राठोड यांनी नांदेड येथे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा केली होती. या तक्रारींची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पाठविले होते. या पथकाने रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला.

Mukhed Hospital   Staff Action
Mukhed Sarpanch Reservation | मुखेड तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

यावेळी आमदार राठोड यांनी अनेक महत्त्वाच्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. रुग्णालयात पूर्णवेळ मुख्यालयी राहणारे वैद्यकीय अधीक्षक नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहत नाही. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नियुक्त करावा, कोविड काळानंतर बंद पडलेला अतिदक्षता विभाग पुन्हा सुरू करावा, तसेच जुन्या इमारतीची पाहणी करून नवीन इमारती उभारण्याबाबत कार्यवाही करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.

रुग्णालयाला आवश्यक पाठबळ देऊनही कर्मचारी व्यवस्थित काम करत नसतील, तर अशा कर्मचाऱ्यांना अन्यत्र पाठवावे आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संधी द्यावी. रुग्ण उपचारासाठी येत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. दुसरीकडे, नर्सिंग स्टाफच्या तत्परतेमुळे रुग्णालयाचा कारभार सुरू असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

आरोग्यमंत्र्यांनी तक्रारींची दखल घेऊन तपासणी पथक पाठविल्याबद्दल आमदार राठोड यांनी आभार मानले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनात त्रुटी

विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे नियोजन शंभर टक्के चुकीचे असल्याचे नमूद केले. यापुढे विषयतज्ज्ञांनी त्यांच्याशी संबंधित कामेच करावीत, याची दक्षता घेतली जाईल. डॉक्टरांची उपलब्धता वाढवून पूर्णवेळ सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल. अस्वच्छतेच्या प्रश्नावर ठोस कार्यवाही करण्यात येईल. भविष्यात बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य केली जाईल. गरज भासल्यास मानधन तत्त्वावर खासगी डॉक्टरांची सेवा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच आवश्यकतेनुसार ११ महिन्यांच्या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Mukhed Hospital   Staff Action
Mukhed Cooperative Election | मुखेड खरेदी-विक्री संघावर ‘बळीराजा’ पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

बायोमेट्रिक हजेरीचीही तपासणी करा!

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असतानाही काही कर्मचारी नांदेड येथे वास्तव्यास राहून मुखेडमध्ये बायोमेट्रिक हजेरी कशी लावतात, याची सखोल चौकशी करावी, अशी सूचनाही आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केली.

या वेळी विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. सतीशकुमार साळुंके, विजय कंदेवाड, डॉ. आकाश देशमुख, डॉ. रणजीत काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके, डॉ. ढगे, लातूरचे ADHS डॉ. जुमेर, डॉ. नवले यांच्यासह नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजकुमार बामणे, पाणीपुरवठा सभापती विनोद दंडलवाड, स्वीय सहायक सुधीर चव्हाण, शिवाजी राठोड, गणेश अंबेकर, अशोक गजलवाड, बाळू नाईक, मनोज कांबळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.