

Nanded Madhavrao, who left home, returns after 29 years
राजेंद्र कांबळे
बिलोली : उच्चशिक्षित असूनही शासकीय नोकरी नाही. गावात काम नाही. त्यामुळे संसाराचा गाडा हाकणे अवघड झाल्यामुळे बेरोजगारीला कंटाळून तीन मुले व पत्नीला न सांगताच रोजगार मिळविण्यासाठी घर सोडून गेलेले माधवराव हे परत घरी आलेच नाहीत. मात्र, ते परत घरी आल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
तेलंगणा सीमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील येसगी येथील उच्चशिक्षित माधवराव प्रचंड यांचा विवाह बिलोली शहरातील सागरबाई यांच्याशी १९८३ साली झाला. लग्नानंतर त्यांना प्रज्ञा, प्रेमला व सुदर्शन असे तीन अपत्य झाले. शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या माध बराव यांना नोकरी काही लागली नाही. दुसरीकडे अवजड काम करण्याची सवय नसल्यामुळे कौटुंबिक गाडा हाकणे त्यांना अवघड झाले होते.
त्यामुळे बेरोजगारीला कंटाळलेल्या माधवराव यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. अवघ्या चार वर्षांचा असलेला मुलगा सुदर्शन यास हॉटेलमध्ये नेऊन मिठाई खाऊ घालून लाडक्या मुलाला घरी सोडून माधवराव यांनी कुटुंबीयांना पूर्वसूचना न देताच १९९७ ला घर सोडले. घर सोडलेले माधवराव नंतर घरी परतलेच नाहीत.
दरम्यान पत्नी सागरवाई व कुटुंबीयांनी तेलंगणा व आंध्रात त्यांचा शोध घेतला. पण, पती सापडले नसल्याने सागरबाईनी मोल-मजुरी करून दोन मुली व मुलाचे पालन पोषण केले. मुलींचे व मुलाचे लग्नावेळी वडील नसल्याने सागरबाईंना अनेक अडचणी आल्या. पण वडील मृत झाले असल्याचा निर्वाळा देत सागरबाईंनी तिन्ही मुलांचे लग्न केले. मुलींना व मुलाला मुले झाली. आपल्या पतीचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवीत पत्नी सागरबाई व मुलगा सुदर्शन हे कौटुंबिक गाडा हाकत असतानाच तब्बल २९ वर्षांनंतर एका कारमधून माधवराव यांना येसगी येथे आणून सोडले. वयाची ६५ वर्षे पार केलेल्या माध वराव प्रचंड यांना प्रारंभी गावातील लोकांनी ओळखलेच नाही. पण, नंतर ओळख पटल्याने माधवराव यांना पाहण्यासाठी गावातील लोकांची व मित्रपरिवाराची गर्दी झाली.
माधवराव परत आल्यानंतर कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलगा सुदर्शनने वडिलाला पाहून मिठ्ठी मारली व घरी आणले. पत्नी, मुले, जावई, सून व नातवंडे पाहून माधवराव गहिवरले व कुटुंबीयांत व नातवंडांत रमले. त्यांनी २९ वर्षांच्या भटकंतीचा परिपाठ कुटुंबीयांना सांगितला.
उच्च शिक्षणानंतर लगेच लग्न झाले. लग्नानंतर प्रशासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या माधवराव यांना शासकीय नोकरी काही मिळाली नाही. शेवटी बेरोजगारीला कंटाळून खासगी नोकरीच्या शोधात तेलंगणा व कर्नाटकात तब्बल २९ वर्षांची भटकंती करणाऱ्या माध वरावने आयुष्यात कमावले काय ? असा प्रश्न समोर येत आहे. माध-वरावांच्या बेरोजगारीला व आर्थिक बाबीला जबाबदार कोण ? प्रशासकीय यंत्रणा, कुटुंबीय की स्वतः माधवराव ? हा प्रश्न मात्र आजही अनुत्तरीतच आहे.