Ladki Bahin Yojana Nanded: पुरुषाने घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जानेवारी २०२६ पासून त्यांचे अनुदान बंद करण्यात आले आहे
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana
Published on
Updated on

मुखेड :राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपये देण्याचे घोषित केले. ही योजना सुरू झाल्यापासून अनेक बहिणींना याचा लाभ मिळत आहे. मात्र, मुखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील एका पुरुषाने या योजनेसाठी अर्ज दाखल केला असून, त्यास मंजुरीही मिळाली.

Ladki Bahin Yojana
Electricity Nanded News: घुंगराळ्यासाठी गावठाण सेपरेशनअंतर्गत १०० केव्हीचे पाच डीपी मंजूर

या योजनेअंतर्गत त्याने ३१ मार्च २०२६ पर्यंत २५,५०० (पंचवीस हजार पाचशे) रुपयांची आर्थिक मदत मिळविल्याची घटना उघडकीस आली असून, यावर शासन काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.मुखेड तालुक्यातील बापशेटवाडी येथील दत्तात्रय हणमंत बाचे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला. त्यास ही योजना मंजूर झाली व ३१ मार्च २०२६ पर्यंत त्यांनी २५,५०० रुपये उचलले. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जानेवारी २०२६ पासून त्यांचे अनुदान बंद करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
Nanded News : वाजपेयींच्या पुतळ्यासाठी अशोक चव्हाणांचा पुढाकार !

या योजनेचे अर्ज तहसील कार्यालयाकडून पात्र लाभार्थ्यांची तपासणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जातात. तेथून परत पडताळणी केल्यानंतर मंजुरीसाठी पाठवण्याची प्रक्रिया होत असताना पुरुष लाभार्थ्याला ही योजना कशी मंजूर झाली, हा चर्चेचा विषय बनला आहे. मुखेड तालुक्यातील एका महिलेचा अर्ज मंजूर करण्यात आला; मात्र ती संजय गांधी निराधार योजनेत असल्याचे दाखवून तिला अनुदानापासून वंचित ठेवले आहे.

Ladki Bahin Yojana
Nanded News : कंधार न्यायालयाच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार !

वास्तविक, त्या महिलेनेही महिला संजय गांधी निराधार व तत्सम कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याचे तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला नेऊन दिले. तरी अद्याप त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळत नसल्याबद्दल या कार्यालयाचा गलथान कारभार मात्र उघड झाला आहे. यावर शासकीय यंत्रणा काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news