

interview for two professors at People's College
संजीव कुळकर्णी
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापलेल्या आणि यंदा आपल्या स्थापनेचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या पीपल्स कॉलेजमध्ये दोन प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या मौखिक मुलाखतीसाठी निश्चित केलेल्या बैठकीपूर्वी 'नांएसी'च्या उपाध्यक्षांनी प्राचार्यासह इतरांनाही आपली 'उद्धटप्रविणत्ता' दाखवत्ताना तेथे हजर असलेल्या उच्चशिक्षण विभागाच्या सहसंचालकांवरही शाब्दिक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गा प्रकाराविरुद्ध महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुखांनीच लेखी तक्रार केली आहे,
पीपल्स कॉलेजच्यामधील वरील घटनेसंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेचे संदीप बने यांनी गेल्या मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करून 'नांएसी' चे उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. वरील कॉलेजमधील प्रा. डॉ. अनंत राऊत यांना अपमानित करण्यात आल्याबद्दल बने यांनी आक्षेप घेतला होता. त्यापूर्वी प्रा. राऊत यांनी संस्थेचे अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकारी मंडळातील सदस्यांकडे संस्था उपाध्यक्षांविरुद्ध विस्तृत तक्रार नोंदविली होती.
प्रा. राऊत यांच्या तक्रारीतून समोर आलेली माहिती अशी की, ११ जून रोजी पीपल्स कॉलेजभया मराठी विभागातील प्रा. यशपाल भिगे आणि प्रा. बालाजी पोतुलवार यांच्या पदोचतीसाठी स्वारातीम विद्यापीठ व शासनाच्या तज्ज्ञ समितीची बैठक दुपारी २ वाजता ठरली होती. त्यानुसार उच्वशिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, कुलगुरू प्रतिनिधी आणि विषयतज्ज्ञ हे सारे प्राचार्याच्या दालनात स्थानापत्र झाले. हे सर्वजणं संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांची प्रतीक्षा करत होते. प्राचार्य जाधव यांनी वेळोवेळी उपाध्यक्ष पाटील यांच्याशी चलभाषवरून संपर्क साधला. त्यानंतर ते साडेतीनच्या सुमारास कॉलेजमध्ये दाखल झाले.
कॉलेजमध्ये आगमन झाल्यानंतर उपाध्यक्ष पाटील यांनी प्रथम प्राचायांना सुनावले, मराठी विभागप्रमुखांचा नमस्कारही त्यांनी स्वीकारला नाही. नंतर ते सहसंचालक किरणकुमार बाँदर वांनाही अद्वातद्वा बोलू लागले. या अनपेक्षित प्रकारामुळे संतप्त झालेले बोदर महामियालयातून निघून जात होते. त्यावरून पाटील यांनी त्यांच्यावर अरे-तुरेच्या भाषेत जोरदार हल्ला केला. पाटील बांनी नंतर प्रा. राऊत यांचीही अत्यंत वाईट पद्धतीने हजेरी घेतली. त्यांना शिवीगाळही केली संस्थेतील या घटनेची माहिती नंतर अध्यक्ष डॉ. व्यंकटेश कान्चे, सचिव प्रा. श्यामल पत्की यांना समजली, त्यानंतर संस्थाप्रमुख या नात्याने डॉ. कान्चे यांनी शिक्षण सहसंचालक किरणकुमार बोंदर यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगण्यात आले. ११ तारखेची ही पटना तब्बल पाच दिवस बाहेर कोणालाही कलू देण्यात आली नव्हती, पण नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रा. अनंत राऊत यांनी संस्थाअध्यक्ष व सचिवांना पत्र पाठवून उपाध्यक्षांच्या 'उद्धटप्रविणतेची तक्रार केली.
पीपल्स कॉलेजमधील नरील प्रकारास शिक्षण सहसंबालक कार्यालयातील सूत्रांकडून दुजोरा मिळाला, तरी स्वतः डॉ. बोंदर यांनी हा विषय माध्यमांकडे नेण्याचे जाणीवपूर्वक टाळले. पण त्यांनी आपला अहवाल विद्यापीठ व अन्य संबंधित वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे समजते.
प्रवीण पाटील यांच्यावर संस्थेने उचित कारवाई करावी, अशी प्रा. राऊत यांची मागणी आहे. अशाप्रकारची अविवेकी व हिंसक प्रवृत्तीची व्यक्ती संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर राहणे कर्मचाऱ्यांसाठी आणि संस्थेसाठी हानीकारक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या वर्तनात अहंकार, अरेरावी आणि अंगावर धावून येण्याची वृत्ती प्रत्ययास आल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.