

'Open Challenge' to politicians to solve traffic problems
नांदेड, पुढारी वृत्तसेवा १५ वर्षांपूर्वी सुमारे हजार कोटी रुपये खर्च झालेले नांदेडचे हेच का ते रस्ते अशी शंका उत्पन्न व्हावी अशी परिस्थिती शहरातील सर्व रस्त्यांवर आहे. वारंवार होणाऱ्या बाहतूक कोंडीला नांदेडकर वैतागले असून झालेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी चढाओढ करणाऱ्या नेत्यांनी वाहतूक समस्या सोडवून दाखवाची, असे खुले आव्हान नांदेडकरांनी दिले आहे.
मागील आठवडयात मुंबई जालना एक्स्प्रेसचा विस्तार होऊन ती नांदेडपर्यंत वाढविण्यात आली. तत्पूर्वी नांदेड-गोवा व बंगळुरुसाठी विमान सुरू होणार या बाबीची श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधीमध्ये सोशल मीडियावर स्पर्धा लागली होती, अरोच प्रकार वेगवेगळ्या निमित्ताने मिळणाऱ्या निधीच्या चाबतीत महामार्गाच्या बाबतीतसुद्धा अनुभवास आले. या कामामध्ये लोकप्रतिनिधीचा सहभाग अजिबात नाही, असे नाही, परंतु नांदेडकरांना दैनंदिन आणि मिनिटागणित भेडसावणाऱ्या समस्यांवर सुद्धा सामूहिक प्रयत्न करून त्या सोडविणे अभिप्रेत आहे.
वाहतूक तसेच वाढत्या गुन् हेगारीला समस्येला नदिडकर वैतागले आहेत. शहरातील सर्व प्रमुख मार्गावर सतत वाहतूक कोंडी होते. बेशिस्त बाहतूक तसेच सतत कोणत्या ना कोणत्या विभागाच्या माध्यमातून वारंवार खोदले जाणारे रस्ते या कारणामुळे वाहतूक खोळंबते. प्रामुख्याने तरोडा नाका ते क्की चौक या प्रमुख मार्गासह अण्णा भाऊ साठे चौक, मुधा चौक ते शिवाजी महाराद पुतळा, जुना मोंढा येथे पोहोंचणारे सर्व छोटे रहते देगलूर नाका, बाफना अंडब्रीज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, डॉक्टर लेन अशा सर्व ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.यात इंधन व वेळेचा अपव्यय होतो. शिवाय एक दुसऱ्याच्या वाहनांना लागणान्या किरकोळ धरूयामुळे होणारी भांडणे या प्रमुख समस्या आहेत.
वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र व या पारंगत विषयात पारंगत पोलिस मनुष्यबळ नाही, पेधील वाहतूक शाखाच तात्प रती तजवीज म्हणून चालविली जाते. परिणामी रहदारीचे मानसशास्त्र, वाहतूक कोंडीची कारणे ती कशी कोणामार्फत दूर करावी, यावर उत्तरे सापडत नाहीत. परिणामी सर्व सामान्यांना रोज धक्के खात प्रवास करावा लागतो आहे.
कालौघात काही हमखास गर्दी होणारे ठिकाणे गर्दी स्थलांतरित करण्याची गरज आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी डॉक्टर्स लेन तयार झाल्या आहेत. येथे सतत वर्दळ असते. रुग्णवाहिकांसह खासगी चारचाकी गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. या मार्ग काढला पाहिजे. नवीन मोंढा बाजारपेठ मध्यवस्तीत आली आहे. तेथे मालवाहू वाहनांची सतत ये-जा असते. याबाबत वेळापत्रक ठरविणे किंवा हा मोंढाच केळी मार्केटच्या धर्तीवर शहराबाहेर हलविणे, असे काही उपाय करता येऊ शकतात. या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याच्या नांदेडकरांच्या प्रतिक्रिया आहेत.