Nanded News : मांजरमसह नायगाव तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा धुमाकूळ

Nanded News
Nanded News : मांजरमसह नायगाव तालुक्यात अवैध वृक्षतोडीचा धुमाकूळFile Photo
Published on
Updated on

Illegal tree cutting rampant in Manjaram and Naigaon talukas

नायगाव, पुढारी वृत्तसेवा नायगाव तालुक्यातील बरवडा सर्कल अंतर्गत मांजरम भागात सर्वाधिक प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून, ट्रॅक्टर व ट्रकद्वारे लाकडाची उघड उघड तस्करी सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, वनविभागाच्या संशयास्पद निष्क्रियतेमुळे हा सुळसुळाट अनियंत्रित झाला असून तस्करांचे मनोबल अभूतपूर्व वाढले आहे.

Nanded News
चव्हाणांच्या प्रभावक्षेत्रात नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक अर्ज !

बरवाहा, मांजरम, कृष्णूर, पुंगराळा, काहाळा, अंतरगाव, सोमठाना, बेटमोगरा, धुष्पा, कुंचेली, धानोरा, रामतीर्थ, बजिरगाव, जिगळा, अजणी, बोरगाव बढी आदी गावांत शेकडो झाडांची कत्तल सुरू आहे. विशेषतः मांजरम परिसर हा या तस्करीचा हब बनल्याचे उघड झाले आहे. तस्वर अत्याधुनिक मीनी जेसीबी, कटर मशीनच्या सहाय्याने रातोरात शेकडो झाडे साफ करत आहेत. पहाटेच्या सुमारास ट्रैक्टर-ट्रकद्वारे लाकूड थेट राज्य महामार्गावरून विना-भय चाहतूक होत असल्याचे नागरिक सांगतात. नाही उघडपणे दिसत आहे.

वनविभाग कोठे?

ट्रक ट्रैक्टर भरून लाकूड खुलेआम महामार्गावरून धावत आहे. तपासणी नाके बंद असल्याने खुलेआमपण अवैच लाकडांची वाहतूक होत असतानाही बरबडा व देगलूर विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Nanded News
Sand Mafia : वाळूमाफियांचे उच्चाटन करण्यात पोलिसांना अपयश

परिसर वाळवंट बनेल

एकीकडे शासन पर्यावरण संवर्धनासाठी लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहीम राबवित आहे, तर दुसरीकडे मांजरम व नायगाव परिसरात झाडांचे सामूहिक नरसंहार सुरू असून झाडे नष्ट होत आहेत. परिणामी जमिनीची धूप, भूजल पातळी, दुष्काळी स्थिती तीव्र होणे, बन्यजीव उद्ध्वस्त होणे, तापमान वाढणे ही संकटे उद्भवत आहे.

रात्रीची गस्त वाढवावी

मांजरम परिसरात विशेष पथक पाठवा, रात्रीची गस्त वाढवून महामार्गावर लाकूड तपासणी नाके सुरू करा. तस्करांवर गुन्हे दाखल करून ट्रक ट्रॅक्टर जप्ती जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करा बननपरिक्षेत्र अधिकारी देगलूर यांनी या अवैध वृक्षतोडीकडे तत्काळ लक्ष देऊन ठोस कारवाई केली नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news