Nanded News : जेवण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्यास नकार, वाढदिवसाच्या दिवशीच पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

नांदेडमधील धक्कादायक घटना; पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nanded News
Nanded News : जेवण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्यास नकार, वाढदिवसाच्या दिवशीच पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्नfile photo
Published on: 
Updated on: 

Husband attempted to murder his wife on her birthday

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : वाढदिवसानिमित्त जेवण्यासाठी बाहेर जाण्यास पत्नीने नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या पतीने आपल्याच पत्नीचा ओढणीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नांदेडमधील सिंचन नगर भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded News
Maha Dialysis Scheme: राज्यातील मोफत डायलिसिस सेवा संकटात! सरकारकडे १,०६७ कोटींची थकबाकी; रुग्णांची चिंता वाढली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंचन नगर येथील रहिवासी राजूपती राजु दशरथ लष्करे (वय ३३ वर्षे) असे आरोपी पतीचे नाव आहे. दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी राजु याने त्याची पत्नी तथा फिर्यादी वैष्णवी राजु लष्करे (वय २२ वर्षे, रा. सिंचन नगर, नांदेड) हिच्या वाढदिवसानिमित्त तिला जेवण्यासाठी बाहेर नेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, फिर्यादी वैष्णवी हिने बाहेर जाण्यास स्पष्ट नकार दिला.

या नकारामुळे संतापलेल्या आरोपी पतीने याचा राग मनात धरून पत्नीला शिवीगाळ केली आणि काही कळण्याच्या आतच तिच्या अंगातील ओढणीने तिचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Nanded News
Nanded Crime News: जागेच्या वादातून महिलेवर चाकूने हल्ला; मायलेकीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

याप्रकरणी पीडित पत्नी वैष्णवी राजु लष्करे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS-2023) कलम १०९(२), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनावणे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.