

Heavy rains in 39 revenue circles of Nanded district
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या पावसाळ्यात पहिला उल्लेखनीय पाऊस बुधवारी (दि. २५) रात्री बरसला. नांदेड जिल्ह्यात ३९ मंडळांतील अतिवृष्टीसह सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तरीही अद्याप पाच तालुक्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही.
पावसाचा अभाव आणि प्रचंड उकाडा यामुळे बियाणे करपण्याच्या मार्गावर होते. नेमका त्यावेळी जोरदार पावसामुळे झालेल्या पेरणीला जीवदान व उर्वरित पेरण्यांना वेग येणार आहे. अन्य झाडाझुडपांमुळे वातावरण हिरवेगार दिसते आहे.
मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे चंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज बांधला जात होता. ८ जून रोजी सुथनि मृग नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. परंतु त्या बरोबर वादळी वारे असल्याने फायद्यापेक्षा नुकसानच अधिक झाले. पण, तरीही त्या आधारे काही क्षेत्रावर पेरण्या झाल्या एकीकडे प्रशासन किमान १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन सतत करीत होते.
लड़सराई आटोपली, आषाडीसाठी ठिकठिकाणाहून दिडधा निघाल्या. परंतु बळीराजाचा जीव मात्र शेतातच अडकला होता, वास्तविक नांदेड जिल्ह्याचा इतिहास पाहता है नातावरण शेतकऱ्यांना नवे नाही. दरवर्षीच जुलैमध्ये दमदार पावसाला सुरुवात होते. यंदा तशीच परिस्थिती आहे. ९ जून रोजी झालेल्या पावसानंतर काल २६ जून रोजी पाऊस झाला. या पावसामुळे झालेल्या पेरण्यांना जीवदान मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांनी घाई सुरू केली आहे.
बुधवारी रात्रभर पाऊस झाल्यानंतरसुद्धा मुखेड, चर्माबाद, उमरी, अर्थापूर नायगाव या तालुक्यात अद्याप १०० मिलीमीटर पाऊस झालेला नाही. गुरुवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार मुखेड तालुक्यात २४.८० मिलीमीटर पाऊस झाला. धर्माबाद २५.१०, उमरी ३७.८०, अर्धापूर ५९.५० तर नायगावमध्ये ३९.९० मिलीमीटर पाऊस झाला. या भागात आणखी पावसाची गरज आहे.
त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. नांदेड तालुक्यात मात्र रात्रीचा पाऊस ७५.५० मि.मी. नोंदला गेला. या तालुक्यातील सहाही मंडळांत अतिवृष्टीची नोंद आहे. दि. २५ रोजीपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७६.२० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर गुरुवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार एकाच रात्रीत ६०.३० मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी गतवर्षीपेक्षा सुमारे ३० टक्के पाऊस कमी होता. तर गुरुवारी हा फरक भर काढत १५ टक्के वाढीव नोंद झाली आहे.