Nanded Crime News : नांदेडमध्ये तलवार, कुकरी अन् खंजीरासह चार तरुण जेरबंद

नांदेड पोलिस 'अॅक्शन मोड'वर : तीन ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल
Nanded Crime News
Nanded Crime News : नांदेडमध्ये तलवार, कुकरी अन् खंजीरासह चार तरुण जेरबंदFile Photo
Published on
Updated on

Four youths apprehended in Nanded with a sword, a kukri, and a dagger

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत भाग्यनगर, वजिराबाद आणि इतवारा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईत तब्बल चार तरुणांना घातक शस्त्रांसह रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी तिन्ही पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nanded Crime News
Nanded Accident : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; एक ठार, एक गंभीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅनॉल रोड भागात २४ जुलै रोजी कारवाई करण्यात आली. सिद्धार्थ नितीन सावते (वय २०, रा. एकतानगर, नांदेड) याच्याकडून लोखंडी खंजीर जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस अंमलदार विष्णुकांत मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.

दुसरी कारवाई वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकपुरा पाण्याचे टाकीजवळ २३ जुलैच्या मध्यरात्री झाली. येथे मोहम्मद ताज मोहम्मद हनीफ (वय २६, रा. जुना एरिया खडकपुरा, नांदेड) हा लोखंडी तलवारीसह आढळला. पोलिस अंमलदार संतोष पावडे यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Nanded Crime News
Nanded Bank : उमेदवार झाले उदार; सहल करून परतले मतदार !

त्याच रात्री (२४ जुलै) वजिराबाद हद्दीतील स्वाद हॉटेल रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) कारवाई करत दिनेश व्यंकटराव शिंदे (वय २३, रा. चिंचोली, ता. लोहा) याला लोखंडी कुकरीसह ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक माधव केंद्रे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला.

याशिवाय, इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर २४ जुलै रोजी केलेल्य कारवाईत अदनान चाऊस सईद चाऊस (वय २१, रा. हमीदीया कॉलनी, नांदेड याच्या ताब्यातून लोखंडी खंजी हस्तगत करण्यात आला. पोलिस अंमलदार हरप्रितसिंग सुखई यांच्य तक्रारीवरून इतवारा ठाण्यात गुन्ह नोंदवण्यात आला असून पोलिस हवालदार कोंडेकर तपास करत आहेत-

विनापरवान शहरात बेकायदेशीररीत्या प्राणघातक शरू बाळगणाऱ्यांवर भारतीय हत्यान कायद्यान्वये कठोर कारवाई केली जात असून, पोलिसांच्या या अचानक सत्रामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news