Nanded Bank : उमेदवार झाले उदार; सहल करून परतले मतदार !

आज बँकेसाठी मतदान; भोकर, मुदखेड आणि अर्धापुरात मतदार दाखल
उमेदवार झाले उदार; सहल करून परतले मतदार !
उमेदवार झाले उदार; सहल करून परतले मतदार ! file photo
Published on
Updated on

Elections of the Nanded District Central Cooperative Bank

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळांची सहल करून परतलेले भोकर, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील मतदार आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर दाखल होणार आहेत. बहुतांश जागा बिनविरोध निवडून आल्या असल्या, तरी भोकर विधानसभा मतदारसंघातील तिन्हीं 'अ' वर्ग पतसंस्था मतदारसंघांत निवडणूक लागल्याने या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

उमेदवार झाले उदार; सहल करून परतले मतदार !
FDA raid Nanded : तीन हॉटेलचे परवाने रद्द, लाखोंचे खाद्यतेल जप्त

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ११ जागा बिनविरोध करण्यात यश आले. मात्र त्यांच्या प्रभावक्षेत्रातील भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर, अर्धापूर आणि मुदखेड या तिन्ही तालुक्यांतील 'अ' वर्ग पतसंस्था मतदारसंघात तिरुपती कोंडेकर, मुदखेड काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, संदीप देशमुख, पिंटू वासरीकर या तरुण तुर्कानी माघार न घेता निवडणुक लावली.

त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना आपल्या मतदारांना सहलीवर पाठवावे लागले. अर्धापूर येथे भाजपचे बी. आर. कदम यांच्याविरुद्ध ज्ञानेश्वर राजेगोरे, मुदखेड येथे मारोती जाधव यांच्याविरुद्ध मारोतराव व्यवहारे, तर भोकर येथे राजू दिवशीकर यांच्याविरुद्ध माधवराव पाटील मातूळकर यांनी उमेदवारी कायम ठेवली. खासदार रवींद्र चव्हाण यांनी विनंती केल्याची चर्चा असतानाही या उमेदवारांनी माघार घेतली नाही.

उमेदवार झाले उदार; सहल करून परतले मतदार !
Nanded Accident : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; एक ठार, एक गंभीर

विशेष म्हणजे मुदखेडचे उमेदवार मारोतराव व्यवहारे यांचा अर्ज प्रारंभीच बाद झाला होता. मात्र लातूर येथील विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या अपीलानंतर तो वैध ठरला आणि त्याचक्षणी निवडणुकीला कलाटणी मिळाली. त्यांच्या उमेदवारीमुळेच भोकर विधानसभा क्षेत्रातील तिन्ही मतदारसंघांत निवडणूक लागल्याचे बोलले जात आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकर तालुक्यातील अनेक मतदारांनी शिर्डी, ओझरचा गणपती आणि आळंदी येथे देवदर्शन केले. अर्धापूर तालुक्यातील मतदारांनी लोणावळा, खंडाळा, सातारा आदी पर्यटनस्थळांना भेटी दिल्या, तर मुदखेड तालुक्यातील अनेक मतदारांनी गोवा पर्यटनाचा आनंद घेतला आहे. आता हे सर्व मतदार परतले असून आज मतदानासाठी आपापल्या मतदान केंद्रांवर हजेरी लावणार आहेत. दरम्यान, "विरोधकांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे निदान सहल तरी झाली," अशा मिश्कील प्रतिक्रिया भोकर, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील काही मतदार व्यक्त करीत आहेत.

विरोधकांच्या प्रचाराचे नारळही फुटले नाही !

भोकर विधानसभा मतदारसंघातील तिन्ही ठिकाणी मतदान होत असले तरी निकाल एकतर्फी खा. अशोक चव्हाण यांच्या गटाच्या बाजूने लागतील, अशीच दाट शक्यता आहे. विरोधी गटाकडे प्रभावी मतदारसंख्या नसून बँक बचाव पॅनलचे तिरुपती कोंडेकर यांनी प्रचाराचा साधा नारळ सुद्धा फोडला नसून एकही मतदार बैठक आयोजित केली नाही. दुसरीकडे मुदखेडचे उमेदवार मारोतराव व्यवहारे यांनी घरपोच पोलचिठ्ठयांचे वाटप करून मतदारांशी थेट संपर्क साधत मतदानाचे आवाहन सुरू ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news