

Farmers and common citizens are suffering due to 90 percent absence of employees in the Tehsil office.
नायगाव, पुढारी वृत्तसेवा : नायगाव तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या मनस्तापाचे कारण ठरत असून, २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण कार्यालयीन दिवस असताना दुपारी बारा वाजता तहसीलमध्ये अक्षरशः 'कर्मचारी नसलेले कार्यालय' असे चित्र दिसून आले. तब्बल ९० टक्के कर्मचारी अनुपस्थित असल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार ढिसाळ कारभार चालवणाऱ्या तहसीलदार गायकवाड यांच्या ढिसाळ कारभाराचा नमुना आहे.
दुष्काळी अनुदान, घरकुल अनुदान, तसेच केवायसीसंबंधीची कामे ठप्प झाली असून, शेतकरी दिवसेंदिवस तहसीलच्या उंबरठ्यावरून परत जात आहेत. नागरिकांतून व्यक्त होत आहे. इंजिनिअर, ग्रामसेवक, तलाठी यांचे फोन बंद तर अधिकारी "उद्या या" असे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील कुठल्याच शेतकऱ्यांचे काम नियमानुसार होत नाही. "तहसीलच्या कर्मचाऱ्यांना जनतेची पर्वा नाही, अधिकारी वर्ग अनुपस्थित आणि शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली", अशी हळहळ ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणांहून खास रजा घेऊन आपल्या कामांसाठी आ-लेले शेतकरी तहसील कार्यालयात धावाधाव करत आहेत; मात्र त्यांनाही निष्फळ परतावे लागत आहे. कार्यालयात अधिकारी तर दूरच, परंतु कारकून, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा मागमूस नाही. फक्त दोन-तीन कोतवाल उपस्थित असल्याचे दिसून आले.