Nanded Zilla Parishad and Panchayat Samiti elections
माहूर : न्यायालयाच्या आदेशाने सुमारे तीन वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींसह "मिनी मंत्रालय" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग आता सुकर झाला असून, दिवाळीनंतर कधीही निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा पहिला टप्पा पार पडला आहे.
त्यानंतर मात्र माहूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एरवी वातानुकूलित गाडीचे सर्व काच बंद करून फिरणाऱ्या नेत्यांना जि. प. व पं. स. निवडणूक टप्प्यात दिसताच सुदामाच्या झोपडीचे उंबरठे झिजविण्याची उपरती झाली आहे. त्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा ही नामी संधी चालून आल्याने आपसुकच त्यांच्या पायाला भिंगरी लागली आहे.
माहूर तालुक्यात जि.प.चे दोन गट आणि पं.स.चे चार गण आहेत. वाई बाजार हा जि. प. गट सर्वसाधारण, तर वानोळा गट ओबीसी करिता आरक्षित झाला आहे. पंचायत समितीमध्ये वाईबाजार सर्वसाधारण, गोंडवडसा ओबीसी, वानोळा ओबीसी महिला आणि हडसणी अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला आहे.
आरक्षण जाहीर होताच गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांनी समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालून चांगलीच धमाल उडवून दिली आहे. वाईबाजार जि.प.गटात बंजारा समाजाचे प्राबल्य असून मराठा, माळी, आदिवासी आणि इतर समाजांची संख्याही लक्षणीय आहे. यागटात शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख तथा माजी जि. प. सदस्य ज्योतिबा खराटे यांना पक्षांतर्गत स्पर्धक नसल्याने त्यांचेसाठी रान अक्षरशः मोकळे मानले जात आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाचे नेते तथा जि. प. चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी वानोळा गटावर आपला मजबूत दावा सांगितला आहे. इथे त्यांना जि.प.चे माजी सदस्य बंडू पाटील भुसारे हे स्वपक्षीय सहकारी सुरुंग लावण्याच्या बेतात आहेत.
याशिवाय बंजारा समाजाचे "राजकीय दैवत" मानले जाणारे माजी आमदार स्व. प्रदीप नाईक यांच्या अकाली निधनाने तो समाज राजकीयदृष्ट्या पोरका झाला आहे. त्यांच्या पुण्याईवर समाधान जाधव यांनी २०१७ च्या जि. प. निवडणुकीत वाई बाजार गटातून ज्योतिबा खराटे या मातब्बर नेत्याला पराभूत करून उपाध्यक्ष पद आपल्याकडे खेचून घेण्याची किमया केली होती. यावेळी मात्र रा. कॉ. (श. प.) या पक्षाला आगामी निवडणूक स्व. प्रदीप नाईक यांचे विना लढवावी लागणार आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कदापि शक्य नाही, परंतु त्यांच्या अपरोक्ष जि. प. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याच्या बाबीचे सोने करण्यासाठी तसेच नाईक कुटुंबीयांना राजकीय स्थैर्य प्राप्त करून देणे, समाजाची राजकीय स्थिती अधिक मजबूत करणे व समाजाचे प्रभुत्व सिद्ध करणे यासाठी सक्षम पर्याय म्हणून बेबीताई नाईक यांना राजकारणात सक्रिय करून त्यांना वानोळा गटातून उभे करण्याचा समाजावर प्रभुत्व असणाऱ्या एका प्रभावशाली गटाने घाट घातला आहे.
त्यामुळे शेवटच्या क्षणी पुण्याईवर समाधान जाधव यांनी २०१७ च्या जि. प. निवडणुकीत वाई बाजार गटातून ज्योतिबा खराटे या मातब्बर नेत्याला पराभूत करून उपाध्यक्ष पद आपल्याकडे खेचून घेण्याची किमया केली होती. यावेळी मात्र रा. कॉ. (श. प.) या पक्षाला आगामी निवडणूक स्व. प्रदीप नाईक यांचे विना लढवावी लागणार आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कदापि शक्य नाही, परंतु त्यांच्या अपरोक्ष जि. प. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याच्या बाबीचे सोने करण्यासाठी तसेच नाईक कुटुंबीयांना राजकीय स्थैर्य प्राप्त करून देणे, समाजाची राजकीय स्थिती अधिक मजबूत करणे व समाजाचे प्रभुत्व सिद्ध करणे यासाठी सक्षम पर्याय म्हणून बेबीताई नाईक यांना राजकारणात सक्रिय करून त्यांना वानोळा गटातून उभे करण्याचा समाजावर प्रभुत्व असणाऱ्या एका प्रभावशाली गटाने घाट घातला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी वानोळा जि. प. गटात उमेदवारीसाठी मोठे रणकंदन होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.
स्व. प्रदीप नाईक यांच्या पत्नी बेबीताई नाईक (जाधव) यांना वानोळा गटातून, तर समाधान जाधव यांना वाईबाजार गटातून निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या धूर्त खेळीने प्रदीप नाईक यांच्या निष्ठावंत मतदारांचा ओघ दोन्ही ठिकाणी वळून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे दोन्ही संभावित उमेदवार "मी मी म्हणणाऱ्यांचे पानिपत" करून मोठे यश पदरी पाडून घेतील अशी संभावना बळावली आहे. एकंदरीतच वाईबाजार जि.प.गटात ज्योतिबा खराटे व समाधान जाधव या परंपरागत स्पर्धकात जर सामना रंगला तर मतदारांसाठी ती बाब एक पर्वणीच ठरणार आहे.