स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून गोरठेकरांना पक्षामध्ये प्रवेश ! उपमुख्यमंत्री पवार आज उमरीमध्ये

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष अजित पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व अन्य नेते शनिवारी नांदेड दौऱ्यावर येत आहेत.
Nanded News
स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून गोरठेकरांना पक्षामध्ये प्रवेश ! उपमुख्यमंत्री पवार आज उमरीमध्ये Pudhari File Photo
Published on
Updated on

Deputy Chief Minister Pawar in Umri today

विशेष प्रतिनिधी

नांदेड : उमरी तालुक्यातील 'गोरठेकर गट' शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये प्रवेश करणार असून तेथे या पक्षात आधीपासून कार्यरत असलेल्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना न जुमानता गोरठेकरांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पाडला जात आहे. त्यातून या पक्षातील बेबनाव पुढे आला आहे.

Nanded News
Nanded Theft | दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून इलेक्ट्रीकल साहित्य लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि 'राष्ट्रवादी'चे अध्यक्ष अजित पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व अन्य नेते शनिवारी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उमरी आणि देगलूर येथे पक्षातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

पक्षाध्यक्षांच्या नांदेड दौऱ्याची, पक्ष प्रवेश सोहळ्याची आखणी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही दिवसांपूर्वी केली. गोरठेकर गटाला आपल्या पक्षात आणण्याचे चिखलीकर यांनी परस्पर ठरविल्यामुळे तेथे आधीपासून कार्यरत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते शनिवारच्या कार्यक्रमापासून दूर झाले आहेत.

Nanded News
ZP Election : इच्छुकांच्या पायाला लागली भिंगरी; वेध मिनी मंत्रालयाचे

उमरीतील डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर हे 'राष्ट्रवादी'चे प्रदेश सरचिटणीस असून त्यांच्या नेतृत्व खाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून गोरठेकर गटाला पक्षात घेण्याचा घाट घातला गेला आहे. असून डॉ. विक्रम देशमुख यांच्या गटाशी त्यांचा चांगला समन्वय आहे; पण आता 'राष्ट्रवादी' त नव्या गटाची घुसखोरी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यातील समन्वय बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे उमरी नगर परिषद निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील, असे दिसत आहे.

गोरठेकर गट सत्तेतल्या एका पक्षात प्रवेश करत असताना, या गटाचे हित ज्या उमरी जीनिंग-प्रेसिंग संस्थेच्या जमीन विक्रीमध्ये गुंतले आहे, त्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून आमदारांनी जमीन विक्रीचे मनसुबे उधळून लावावेत, अशी मागणी एका गटाकडून पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news